यावल मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार यावल फैजपूर रस्त्याने गस्त करीत असतांना संशयित रिक्षा क्रमांक MH01CQ-0249 याची तपासणी केली असता वाहणातून साग तयार पलंग वाहतूक करीत असतांना दिसला, वाहन चालकास सदर वाहतुकीसाठी परवाना / पास बद्दल विचारले असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना मिळून आला नाही.

सदरील वाहन तसेच पलंग भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (2 ब) अन्वये जप्त करून पलंग नग 1, घन मीटर 0.069, माल किंमत 18000/- रु तसेच वाहन किंमत 150000/- एकूण 168000/- इतकी असुन मुख्य विक्री केंद्र यावल येथे जमा केला. गुन्हे कामी आगार रक्षक यावल यांनी गुन्हा क्रमांक 01/2025 दिनांक. 13/03/2025 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.सदरील कारवाई ही मा. वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त निनु सोमराज , मा.उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख , मा. विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे, राजेंद्र सदगिर , मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व स्वप्नील फटांगरे, यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आली. कार्यवाही दरम्यान आगार रक्षक यावल, बी. बी. गायकवाड तसेच वाहन चालक महेश चौहान उपस्थित होते.









