तळीरामांनी लावली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये आग, अर्धा हेक्टर जंगल जळून खाक, पोलिसांकडून तपास सुरू.

मुंबईतील बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींनी जंगलात आग लावली. आग जवळपास दीड तास प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. या आगीत राष्ट्रीय उद्यानातील अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले. पोलिस आता याप्रकरणात तपास करत आहेत.एक अतिशय धक्कादाक माहिती पुढे येताना दिसतंय. मुंबईच्या बोरिवली इथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला आग लागली. हैराण करणारे म्हणजे ही आग जंगलामध्ये तळीरामांनी लावली. दारूच्या नशेत त्यांनी चक्क जंगलात आग लावली. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. होळी म्हटले की, तळीरामांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो. होळी असल्याने मोठ्या संख्येमध्ये तळीराम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलाजवळा असलेला दहिसर परिसरात गेले होते. तिथे त्यांच्या पार्ट्या सुरू होत्या.अचानक रात्री सहाच्या सुमारास दहिसर नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये मोठ्या आगीचे लोट दिसले. यानंतर अनेकांनी तिथून पळ देखील काढला. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग तळीरामांकडून लावण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

जवळपास दीड तास या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला लागले.या आगीच्या घटनेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले असल्याचीही माहिती मिळतंय. अग्निशमन दल घटनास्थळी वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. आता ही आग नेमकी कोणी लावली याचा शोध हा घेतला जातोय. घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील पोहोचले होते. ज्यावेळी ही आग लावण्यात आली, त्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सुरक्षारक्षक उपस्थित होते.

मात्र, आगीचे लोट दिसल्यानंतर घटना उघडकीस आली.वनक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचारी देखील आग विझवण्यासाठी पोहोचले होते. या घटनेबद्दलचा अधिक तपास आता पोलिसांकडून केला जातोय. संबंधित लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. होळीनिमित्त शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळाला. जागोजागी पोलिसांकडून तपासणी केली जात होती. लोक होळी खेळण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..