व्यावसायिक दाम्पत्याकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी, भाजप पदाधिकाऱ्यावर नाशकात गुन्हा.

रोहितसह त्याच्या वडिलांविरुद्ध भद्रकाली पोलिसांत खंडणी, महाराष्ट्र सावकारी अधिनियमासह लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदविण्यात आला.भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्याने जुने नाशिक परिसरातील व्यावसायिक दाम्पत्याकडून खासगी सावकारीतून अतिरिक्त व्याज वसूल करून ५० लाखांची खंडणी मागितली. तसेच, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.रोहित कैलास कुंदलवाल (वय ३४, रा. फ्लॅट-४, राधाकृष्ण बंगला, उदय कॉलनी, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. रोहितसह त्याच्या वडिलांविरुद्ध भद्रकाली पोलिसांत खंडणी, महाराष्ट्र सावकारी अधिनियमासह लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी अटक केल्यानंतर नाशिक न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.जुने नाशिक परिसरातील हुंडीवाला लेनमध्ये कापड व्यावसायिक असलेल्या चाळीसवर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार रोहितसह कैलास बाबूलाल कुंदलवाल (वय ५६) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. तक्रारदार महिलेसह तिच्या पतीने कापड व्यवसायासाठी संशयिताकडून डिसेंबर २०२२ मध्ये १५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. रोहित व कैलास हे खासगी सावकारी करीत असल्याची माहिती तक्रारदारांना मिळाली होती. त्यानुसार कुंदलवाल याने १५ लाख रुपये फिर्यादीला दिले.

त्यानंतर वेळोवेळी ३८ लाख रुपयांची वसुली केली. त्यानंतर मुद्दल व व्याज धरून पन्नास लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्याने संशयिताने फिर्यादीला कॉलेजरोड परिसरातील बिग तवा हॉटेलबाहेर बोलावले.तेथे बळजबरीने फिर्यादीला आलिशान कारमध्ये बसवून प्रसाद सर्कल परिसरातील आलिशान जीममध्ये नेले. तेथे फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल या स्वरूपात कृत्य करून शिवीगाळ केली. त्यानंतर पंचवटीतल्या भक्तिधामजवळ दाम्पत्याला बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवून ५० लाख रुपयांची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हुंडीवाला लेनमधील दुकानात जाऊन फिर्यादीच्या पंधरावर्षीय मुलीचा हात धरून तिला जवळ ओढून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर ‘पुढे काय ते समजून घ्या’, अशी धमकी दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या दाम्पत्याने पोलिसांत धाव घेतली.याप्रकरणी १३ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा नोंद झाल्यावर रात्री उशिरा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि. १४) त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली असून, त्याच्या साथीदारांसह पसार झालेल्या वडीलांचा शोध सुरू आहे.

भद्रकाली पोलिसांत गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांचे पथक संशयिताच्या मागावर रवाना झाले. त्याला ताब्यात घेतल्यावर अंगझडती घेण्यात आली. यावेळी मोबाइल, रकमेसह एका बाजूने २६ व दुसऱ्या बाजूने २९ अशी एकूण ५५ जणांची यादी असलेला एक कागद त्याच्या खिशात आढळून आला. त्यानुसार संशयिताने या ५५ लोकांना खासगी सावकारीतून पैसे दिल्याचा पोलिसांना संशय आहे. यासह त्याच्या घरातून एक छोटी डायरी जप्त करण्यात आली. त्यात वेगवेगळ्या पानांवर व्यक्तींची नावे, रकमांसह दिनांक व स्वाक्षरी केलेली आहे. त्यानुसार संशयित रोहित व त्याच्या साथीदारांनी ज्यांच्याकडे खंडणी मागितली आहे किंवा खासगी सावकारीतून त्रास दिला, त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची सूचना पोलिस आयुक्तालयाने केली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.