आनंद क्षणात मावळला; धुळवड साजरी करुन तलावावर गेला अन्… मित्रांसमोरच तरुणाचा हृदयद्रावक अंत.

 रायगडच्या उरण तालुक्यात एक तरुण धुळवड साजरी करुन मित्रांसोबत तलावात अंघोळीला गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला.महाराष्ट्र सहित रायगड जिल्ह्यात धुळवडीची धामधूम असताना रायगड जिल्ह्यातील भेंडखळ गावानजीक असणाऱ्या द्रोणगिरी नोड येथे असणाऱ्या तलावात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. घनश्याम संतराम जयस्वाल (वय ३२ वर्ष, व्यावसाय- चालक रा. ५३८ केए/१४५०, सीतापुर रोड त्रिवेणी नगर २, पोस्ट- निराळा नगर, लखनऊ, उत्तर प्रदेश ) या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली असल्याची माहिती मयत घनश्याम संतराम जयस्वाल यांनी उरण पोलिस ठाण्यात दिली आहे.शुक्रवारी (१४ मार्च) रोजी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करून झाल्यानंतर उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील तलावात घनश्याम संतराम जयस्वाल हा त्याचे मित्र मुकेश चौधरी, दिनेश यादव, अमरजीत यादव यांच्यासोबत आंघोळ करण्यासाठी गेला होता.

मात्र, मयत घनश्याम जयस्वाल याला तलावाच्या पाण्याचा अंदाज न घेता आल्यामुळे बुडाला. त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन तो बेशुद्ध पडला. हे लक्षात येताच त्याला उरण येथील रुग्णवाहिकेतून इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे आणले असता कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे.मृत घनश्याम जयस्वाल धुळवडीच्या दिवशी अंगोळ करण्यासाठी गेला होता. मात्र, ही त्याची आयुष्याची शेवटची अंघोळ या तलावात झाली असल्याचं पाहून मित्रमंडळी यांनी हळहळ व्यक्त केली. हा तरुण भारत गॅस या प्रकल्पात येणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून काम पाहत होता.

या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. याबाबत उरण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने जयस्वाल कुटुंबाला मोठा धक्का बसला असून होळीचा आनंद शोकात बदलला आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.