पार्टनरशिपमध्ये जिम, एकाची १५ दिवसाची लेक, दुसऱ्याची बायको प्रेग्नंट, पुण्यातील सख्ख्या मित्रांचा एकत्रच अपघाती मृत्यू.

एकाच वेळी दोघा मित्रांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे मृतांपैकी एकाची मुलगी १५ दिवसांची आहे, तर दुसऱ्याची पत्नी गरोदर आहे.वाई तालुक्यातील पसरणी घाटात  दोनशे फूट खोल दरीत  दोघा सख्ख्या मित्रांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. होळी पौर्णिमेच्या दिवशी पाचगणी-वाई रस्त्यावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. सर्व जण हे लोणी काळभोर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या जखमींवर वाईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच वेळी दोघा मित्रांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे मृतांपैकी एकाची मुलगी १५ दिवसांची आहे, तर दुसऱ्याची पत्नी गरोदर आहे.पसरणी घाटात पाचगणी-वाई रस्त्यावर बुवासाहेब मंदिराजवळ शंभर मीटर अंतरावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर घाट उताराचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी दोनशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये अक्षय म्हकू काळभोर, सौरभ जालिंदर काळभोर यांचा मृत्यू झाला, तर बजरंग परबतराव काळभोर व वैभव काळभोर (रा. लोणी काळभोर, जिल्हा पुणे) हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

त्यांना वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच सिद्धनाथवाडी येथील शिवसह्याद्री मदत पथकाच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी जखमींना बाहेर काढले.लोणी काळभोर परिसरातील चार मित्र दोन दिवसांपूर्वी कोकणात फिरण्यासाठी गेले होते. होळीच्या सण म्हणून ते गुरुवारी सायंकाळी घरी परत येत होते. दरम्यान, ते कारने पसरणी घाटात आल्यानंतर त्यांच्या गाडीचा वेग अनियंत्रित झाला आणि कार २०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात अक्षय आणि सौरभ यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मित्र वैभव आणि बजरंग गंभीर जखमी झाले. या वेळी वाई पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अक्षय आणि सौरभ काळभोर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सौरभ हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि अवघ्या १५ दिवसांची मुलगी आहे. अक्षयचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. सौरभ आणि अक्षय यांनी भागीदारीत एम्पायर फिटनेस नावाने जिम सुरू केली होती. दोघांनी एकत्रित अनेक स्वप्नही रंगवली होती, मात्र सारंच चित्र पुसलं गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.