भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली. पुण्यातील दशभुजा गणपती मंदिराजवळील ही घटना घडली आहे.

पुण्यात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील भयानक घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली. पुण्यातील दशभुजा गणपती मंदिराजवळील ही घटना घडली आहे. परशुराम वैश्यंपायम (82) असे अपघातात जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम वैश्यंपायम हे संध्याकाळी सहकारनगर भागात असलेल्या दशभुजा गणपतीजवळ थांबले होते.

त्या ठिकाणाहून भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.अपघातात जखमी झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीला एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला, अपघातात दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेल्या हे दोघे जखमी असून त्या दोघांना सुद्धा रुग्णालयात दाखल केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत पर्वती पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  सुरू होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यांवरून चालणाऱ्या लोकांच्या जीवाचा प्रश्न समोर आला आहे. या घटनेतील जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.