पुण्यातील सदाशिव पेठेत मोठा राडा, किरकोळ वादातून तरूणावर कोयत्याने हल्ला.

पुण्यात सदाशिव पेठेत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने २६ वर्षीय अक्षय वाघवर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या मित्राने मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यावरही हल्ला झाला. खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने राडा करून एका २६ वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाच्या मदतीला धावून आलेल्या दुसऱ्या तरुणावरही वार करण्यात आले. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय वाघ (वय २६, रा. आंबेगाव पठार) असे टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. अक्षय नऱ्हे येथील क्वालिटी कंपनीत मशिन ऑपरेटर म्हणून काम करतो. रविवारी (नऊ मार्च) रात्री नऊ वाजता तो मित्रासोबत क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी चिमण्या गणपती चौक येथे गेला होता.

सामना संपल्यानंतर रात्री साडेदहा वाजता तो घरी जात असताना दोन जणांसोबत किरकोळ वाद झाला. त्यांनी अक्षयला शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षयच्या एका मित्राने भांडण सोडवले. त्यानंतर अक्षय आणि त्याचे मित्र सदाशिव पेठ परिसरातील जयदीप फर्निचर दुकानासमोरील कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. पावणेअकराच्या सुमारास आधी भांडण झालेले दोघे आणि अन्य १२ ते १३ जण तेथे आले. त्यांनी अक्षयवर हल्ला चढवला. टोळक्याने अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने अक्षयच्या डोक्यावर, पाठीमागे आणि पाठीवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.अक्षयचा मित्र त्याला वाचवण्यासाठी पुढे आला असता, हल्लेखोरांनी त्याच्याही हातावर कोयत्याचे वार केले.

हल्लेखोरांनी परिसरात दहशत माजवून आरडाओरड केली आणि कोयते हवेत फिरवून पलायन केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. अक्षय वाघला त्याच्या मित्राने तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत.कर्वेनगर परिसरात धारदार हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. रवींद्र वामन ढोले (वय ३५, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ मार्चला मध्यरात्री कर्वेनगरमधील कॅनॉल रस्ता परिसरात पोलिसांनी सापळा रचला. आरोपी हातात धारदार हत्यार घेऊन रस्त्यावर आरडाओरडा करीत होता. ‘मी इकडचा भाई आहे, कोण पोलिसांना माझी माहिती देतोय? समोर या, खल्लास करतो,’ अशा धमक्या तो देत होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.