नशाबंदी मंडळ महाराष्ट्र व देशमुख विद्यालय थोरगव्हाण यांचे तर्फे व्यसनांची प्रतिकात्मक होळी दहण . भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण (स्थापना 1917 ) ता रावेर जि जळगांव येथील डी एस देशमुख माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना समिती , तंबाखू मुक्त समिती तर्फे व्यसनांची प्रतिकात्मक होळी दहण केली . कार्यक्रमाची प्रेरणा नशाबंदी मंडळ महाराष्ट्रचे सचिव तथा अध्यक्ष दि एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण चंद्रकांत चौधरी यांनी दिली . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील होते . मादक पदार्थ ,मादक द्रव्य यांचा मानवी शरीरावर विपरीत अनिष्ठ परिणाम होतात कर्करोग या सारखे आजार होतात . मानसिक स्वास्थ्य मिळत नाही परिणामी व्यक्ती व समाजाचे वैयक्तीक सामाजिक आर्थिक नुकसान होते असे मत व्यक्त केले . व्यसनांचे प्रतिकात्मक दहण करून पर्यावरण संरक्षण ,व्यसनमुक्तीचा संदेश या कार्यक्रमातून दिला .
प्रथम ५ वी ते12 वी सर्व वर्गातील डस्टबीन मधील टाकाऊ कागद , रॅपर्स , झाड पाला पाचोळा , लाकुड फाटा ज्वारी पेंढी यांची जुळवा जुळव केली व प्रातिकात्मक गुटखा , सिगारेट , दारू , जर्दा , सुगंधी पानमसाला , सुपारी , विडी या सारखे पाठकोऱ्या कागदावर लिहलेले प्रतिके यांची होळी केली .टी .पी घुले , वाय जे कुरकुरे , जे ए चौधरी , जयश्री चौधरी एन बी चौधरी , नयना पाटील , एस बी सपकाळे , के एम पाटील , एस पी पाटील ‘एन ए देशमुख , लिपीकआर के
वानखेडे , शिपाई एस पी झोपे उपस्थित होते .
नाविन्यपूर्ण उपकृमासाठी विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते
जयश्री चौधरी यांनी होळी क्षणाचे महत्व मनोगतातून व्यक्त केले . कार्यक्रमाची तयारी क्रीडाशिक्षक जे ए चौधरी , नशाबंदी मंडळ महाराष्ट्राचे वाय जे कुरकुरे यांनी केली . नशाबंदी मंडळ महाराष्ट्र वर्षा विद्या विलास तसेच चंद्रकांत चौधरी यांनी या कार्यक्रम आयोजन बाबत अभिनंदन केले आहे . प्रास्ताविक सुत्रसंचालन वाय जे कुरकुरे यांनी केले .









