धनंजय देशमुखांच्या साडूचे आत्मसमर्पण, मारहाण आणि घरावरील हल्ल्यानंतर दादा खिंडकर विरोधात गुन्हा दाखल.

बीडमधील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर याचा क्रूर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खिंडकर हा एका मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. यासोबतच त्याचा घरावर हल्ला करतानाचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला.सध्या बीडमधील मारहाणीचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामुळे खळबळ निर्माण झालीये. संतोष देशमुख यांच्या हत्येदरम्यानचे काही फोटो व्हायरल झाली. ज्यानंतर बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडीओ पुढे येत आहेत. टोळक्यांकडून एकाच मुलाला मारहाण केली जातंय. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर याचा सुरूवातीला एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आला. या व्हिडीओमध्ये दादा खिंडकर एका मुलाला क्रूरपणे मारहाण करताना दिसला.

दादा खिंडकरसोबतच अजून काहीजण त्या मुलाला पट्टाने, पाईपने आणि काठ्यांनी शेतात मारहाण करताना दिसले. तो मुलगा जोरजोरात ओरडताना देखील व्हिडीओमध्ये दिसत स्पष्ट दिसत होता. दादा खिंडकर याच्याकडून आणि त्याच्या टोळीकडून तरीही मारहाण सुरूच ठेवण्यात आली. संतोष देशमुखांच्या न्यायासाठी काही दिवसांपासून दादा खिंडकर लढताना दिसत होता. मात्र, दुसरीकडे तेच क्रूरपणे मारहाण करताना दिसतोय.दादा खिंडकरने स्पष्ट केले की, व्हायरल होणारा व्हिडीओ जुना आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर बीड पोलिस अॅक्शन मोडवर आले. दादा खिंडकर विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. आता दादा खिंडकर पोलिसांना शरण आलाय. फक्त एकच नाही तर दादा खिंडकरचे दोन व्हिडीओ व्हायरल झाली.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये एका घरावर हल्ला करताना दादा खिंडकर दिसला. आता एसपी ऑफिसमध्ये दादा खिंडकरने आत्मसमर्पण केले.मारहाण आणि घरावर हल्ला केल्याप्रकरणी बीड पोलिस ठाण्यात दादा खिंडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. दादा खिंडकरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर याबद्दल धनंजय देशमुख यांनी अजून काही प्रतिक्रिया दिली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा खिंडकर याने प्रतिक्रिया दिली होती आणि जुना व्हिडीओ अजून तो मुद्दाम व्हायरल करण्यात आला. ते प्रकरण आम्ही त्यावेळीच मिटवले होते, असे दादा खिंडकरने म्हटले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.