धक्कादायक : दोन्ही मुलासह आईने घेतली विहिरीत उडी .

राज्यातील अनेक शहरातून धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने त्या दोन्ही मुलांसह गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथे बुधवारी 12 मार्च रोजी ही घटना घडली .चित्रा कविराज हाके (वय, २८), पृथ्वीराज हाके (वय, ७), स्वराज हाके (वय, दीड वर्षे) अशी मयतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हाके कुटुंबीय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी रोडवरील मूळचे नान्नज येथील होते. कविराज उर्फ दत्तात्रेय हाके काही वर्षांपूर्वीच कुटुंबासह पत्नीच्या माहेरी वांगी येथे राहण्यास आले होते. त्यांना एक आठ वर्षाची मुलगी आहे. चित्रा यांची पृथ्वीराज व स्वराज अशी दोन मुले होती. पृथ्वराज हा जन्मतः गतिमंद होता. त्यानंतर स्वराज जन्माला आला. स्वराज देखील गतिमंदच जन्माला आला. दोन्ही पोरं गतिमंद जन्माला आल्याने चित्रा यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत होती. दोन्ही मुलं गतिमंद जन्माला आल्याने चित्रा हाके अनेक दिवसांपासून निराश होत्या.

चित्रा हाके यांनी चिंतेतून टोकाचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास गावाजवळील विहिरीत त्यांनी मुलांसोबत उडी घेतली. त्यावेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळ्या चारणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. शेळ्या चारणाऱ्या तरुणीने विहिरीकडे धाव घेतली. विहिरीलगत दाट झाडी असल्याने विहिरीपर्यंत जायला वेळ लागला. विहिरीत डोकावून पाहिल्यावर तीन वर्षाचा स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.