नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सव्वा कोटींची मदत वितरीतकक्षाकडून कार्यवाही पूर्ण.

ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या नेपाळमधील या दुर्घटनेतील मृंतांमध्ये जळगांव जिल्ह्यातील वरखेडे, तळेगांव, मुशी आणि अन्य परिसरातील २५ जणांचा समावेश होता. याची दखल घेत, तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यु झालेल्या भाविकांच्या कुटुंबियांसोबत राज्य शासन उभे असून मदत म्हणून मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.ऑगस्ट २०२४ मध्ये नेपाळ मधील काठमांडू येथील देवदर्शनासाठी जाताना बस दरीत कोसळून जळगांव जिल्ह्यातील २५ भाविकांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून सव्वा कोटी रुपयांची मदत वितरीत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या नेपाळमधील या दुर्घटनेतील मृंतांमध्ये जळगांव जिल्ह्यातील वरखेडे, तळेगांव, मुशी आणि अन्य परिसरातील २५ जणांचा समावेश होता. याची दखल घेत, तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यु झालेल्या भाविकांच्या कुटुंबियांसोबत राज्य शासन उभे असून मदत म्हणून मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.

या घोषणेला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार मृतांच्या कुटुंबांतील वारसाला ५ लाख रुपये, अशा रितीने २५ कुटुंबियांना १ कोटी २५ लाख रुपयांची मदत वितरीत करण्याची कार्यवाही पूर्ण केली गेली असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.ही मदत केवळ आर्थिक आधार नसून, कठीण काळात सरकार नागरिकांच्या पाठीशी उभे असल्याचे प्रमाण आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून या कुटुंबांना काही अंशी दिलासा मिळावा यासाठीचा हा प्रयत्न आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातून निघालेली एक बस नेपाळच्या प्रमुख महामार्गावरील मर्स्यांगडी नदीत कोसळली. २३ ऑगस्ट २०२४ शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला होता. नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर पश्‍चिमेकडे अबुखैरेनी गावजवळ हा अपघात घडला होता.

ही बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर ही एजन्सी नोंदणीकृत आहे.
महाराष्ट्रातील काही भाविकांनी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या तीन बस बुक केल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ११० लोकांना घेऊन तीन बस प्रवास करीत होत्या. यापैकी जळगाव जिल्ह्यातील ४० ते ५० भाविक होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.