‘हिंदू’च्या सणांमध्ये एकोप्याचा गोडवा! मुस्लिम कुटुंबाच्या तीन पिढ्या करताहेत होळीत ‘हार-कडे’.

हिंदूच्या जिव्हाळ्याच्या सणांमध्ये दिवाळीत साखरेचा नारळ व बत्तासे, तर होळीत साखरेचे ‘हार-कडे’ तयार करून गोडवा पेरण्याचे काम मागील तीन पिढ्यांपासून मुस्लिम कुटुंब करीत आहे.आज एकीकडे मनामनात जाती-धर्माच्या भिंती उभ्या राहत असतानाच दोन धर्मांमधील एकात्मतेची साक्ष देणारी प्रतीके कित्येक वर्षांपासून भक्कमपणे परंपरा जोपासत आहेत. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील नासीर अजीज हलवाई यांचे कुटुंब होय. हिंदूच्या जिव्हाळ्याच्या सणांमध्ये दिवाळीत साखरेचा नारळ व बत्तासे, तर होळीत साखरेचे ‘हार-कडे’ तयार करून गोडवा पेरण्याचे काम मागील तीन पिढ्यांपासून मुस्लिम कुटुंब करीत आहे. व्यवसाय म्हणून नव्हे, तर एक परंपरा म्हणून हे काम करीत असल्याचे नासीर हलवाई सांगतात.नासीर हलवाई यांचे कुटुंब हे अमळेनर येथील रहिवासी आहे. मात्र, दिवाळीसाठी वीस दिवस व होळीसाठी तब्बल एक महिना ते कुटुंबासह जळगाव शहरात येतात. कासमवाडीत ते आपला कारखाना लावतात. दिवाळीत साखरेचे नारळ व बत्तासे तयार होतात. यंदाही हलवाई कुटुंबाने शिवरात्रीपासून आपला कारखाना सुरू केला आहे. कुटुंबातील सर्व सदस्य व दहा मजूर या ठिकाणी महिनाभर थांबतात. सध्या या कारखान्यात होळीसाठी लागणारे साखरेचे हार व कडे तयार केले जात आहेत.

पारंपरिक लाकडी साच्यांमध्ये साखरेच्या पाकद्वारे तयार होणारे पदार्थ पाहत राहणेदेखील फारच सुखदायी आहे.गेल्या ३५ वर्षांपासून हलवाई कुटुंबाच्या तीन पिढ्या जळगावात साखरेच्या गाठींचे हार-कडे बनवून हिंदू बांधवांच्या होळी सणाचा गोडवा वाढवत आहेत. जळगाव शहराही जिल्ह्याची मोठी बाजारपेठ असल्याने अमळनेरहून एका महिन्यांसाठी अजीज करीम हलवाई येतात. महिनाभरात या कारखान्यात तब्बल शंभर क्विंटल साखरेचे हार व कडे तयार केले जातात. विशेष म्हणजे, ते संपूर्ण खान्देशातील किरकोळ बाजारातील विक्रेत्यांकडून नेले जातात.हिंदू धर्मात होळी, रंगपंचमी या सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

होळी आणि रंगपंचमी म्हणजे एकमेकांतील भेदभाव विसरून एकत्र येत विविध रंगांची उधळण करण्याचा उत्सव आहे. होळीला साखरेचे हार व कड्‌यांचा नैवेद्य दिला जातो. गुढीपाडव्यालादेखील गुढीला साखरेचा हार घातला जातो. त्यामुळे हिंदू सणात होळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत हार-कड्यांना चांगलीच मागणी असते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.