नरबळी देण्यासाठी संबंधित भोंदूबाबाने दीड वर्षापासून घरात वीस फुटांचा खड्डा खोदून ठेवला होता. एका पाच वर्षीय पायाळू मुलीला ताब्यात घेण्यासाठी षड्यंत्र रचले होते.गुप्तधनासाठी कोवळ्या मुलीचा नरबळी देण्याचा भोंदूबाबाचा प्रयत्न पोलिसांच्या उघडकीस आला. नरबळी देण्यासाठी संबंधित भोंदूबाबाने दीड वर्षापासून घरात वीस फुटांचा खड्डा खोदून ठेवला होता. एका पाच वर्षीय पायाळू मुलीला ताब्यात घेण्यासाठी षड्यंत्र रचले होते. गणेश दामोदर लोखंडे असे आरोपीचे नाव आहे.वालसा वडाळा (ता. भोकरदन) येथील ज्ञानेश्वर आहेर यांनी तीन मार्च रोजी आत्महत्या केली. त्यांच्या खिशातील चिठ्ठीत गणेश दामोदर लोखंडे याने दिलेल्या मानसिक त्रासातूनच आत्महत्या केली, असा मजकूर होता. पोलिसांनी लोखंडे यास धामणगाव येथून अटक केली.










