चिमुकला सोसायटीच्या आतमध्ये खूप वेळ खेळत होता, मात्र बराच वेळ झाल्यानंतर चिमुकला घरी परतला आला नसल्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली.स्विमींग पूलमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्यातील धायरी भागात पार्क व्हिव सोसायटीमध्ये हृदयाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडला आहे. सोसायटीमध्ये मित्रांसोबत खेळताना स्विमिंग पूलमध्ये पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
निनाद गोसावी (वय ६ वर्ष) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. काल, मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हा चिमुकला सोसायटीच्या आतमध्ये खूप वेळ खेळत होता, मात्र बराच वेळ झाल्यानंतर चिमुकला घरी परतला आला नसल्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर तब्बल दोन तासांनी तो चिमुकला स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.










