इंजेक्शनमधून विष देऊन भाजप नेत्याची हत्या? PM रिपोर्टमुळे प्रकरणाला नवं वळण; केस फिरली.

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते गुलफाम सिंह यादव यांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. एका व्यक्तीनं यादव यांच्या पोटात विषारी इंजेक्शन दिल्याचे आरोप झाले होते.उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते गुलफाम सिंह यादव यांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. एका व्यक्तीनं यादव यांच्या पोटात विषारी इंजेक्शन दिल्याचे आरोप झाले होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. आता यादव यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये विषाचा उल्लेख कुठेच नाही. पोलिसांनी गुलफाम यांचा विसेरा सुरक्षित ठेवला आहे. पुढील तपासासाठी तो फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला आहे.१० मार्चच्या दुपारी गुलफाम त्यांच्या शेतात होते. तेव्हा तिथे तीन जण पोहोचले. त्यांनी गुलफाम यांना वाकून नमस्कार केला.

त्यांच्या पाया पडले. गुलफाम यांनी त्यांच्या नोकराला तिघांना पाणी देण्यास सांगितलं. या दरम्यान तिघातला एक जण बाहेर गेला. तर अन्य दोघे गुलफाम यांच्या सोबत बसले. तेव्हा एका व्यक्तीनं गुलफाम यांच्या पोटात इंजेक्शन देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यानंतर दोघे दुचाकीवरुन फरार झाले.गंभीर अवस्थेत असलेल्या गुलफाम यांना आधी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. मग त्यांना अलीगढला हलवण्यात येत होतं. पण त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. ११ मार्चला गुलफाम यांचा मुलगा विनय प्रकाशनं ३ अज्ञातांविरोधात जुनावई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.जुनावई पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर सुनील कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलफाम यादव यांच्या मुलानं दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०१ च्या अंतर्गत एफआयआर नोंदवला. फरार आरोपींच्या शोधासाठी ८ पथकं तयार करण्यात आली आहेत. आम्हाला अद्याप तरी शवविच्छेदन अहवालाची प्रत मिळालेली नाही. पण तोंडी माहिती मिळाली आहे. अहवालात कुठेही विषाचा उल्लेख नाही. सखोल तपासासाठी यादव यांचा विसेरा आग्र्यातील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला आहे.पोलिसांनी घटनास्थळावरुन सिरिंजचं एक वेष्टन आणि एक हेल्मेट जप्त केलं. ते आरोपी मागे सोडून गेले होते. संभलच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुकृती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सगळ्या अंगांनी तपास सुरु आहे. सध्या तरी ही ब्लाईंड मर्डर केस आहे. कारण या प्रकरणात कोणीही साक्षीदार नाही. गुलफाम यांच्या शरीरावर इजा झाल्याची कोणतीच खूण नाही. त्यांच्या पोटावर इंजेक्शन दिल्याची खूण आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.