पती-पत्नीचा वाद अन् चिमुकलीच्या खुनाचं गूढ उकललं; भाडेकरुनं सत्य सांगताच आई, बापाचा आक्रोश.

 उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमित आणि रश्मी या दाम्पत्यात वाद होतो. दोघे एकमेकांशी अबोला धरतात. रागाच्या भरात रश्मी त्यांची जुनी घरमालक असलेल्या पुष्पाकडे जाते. तिथे ती सुमितच्या हातून २ वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचं गूढ उकलते.उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमित आणि रश्मी या दाम्पत्यात वाद होतो. दोघे एकमेकांशी अबोला धरतात. रागाच्या भरात रश्मी त्यांची जुनी घरमालक असलेल्या पुष्पाकडे जाते. तिथे ती सुमितच्या हातून २ वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचं गूढ उकलते. ते ऐकून पुष्पा आणि तिचे पती धीरेंद्र आक्रोश सुरु करतात. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागतात. दोन वर्षांपूर्वी पुष्पा यांच्या ५ वर्षीय मुलीचं (किट्टू) कोणीतरी अपहरण केलं होतं. तेव्हापासून सगळेच तिचा शोध घेत होते. पण ती सापडली नाही. आता रश्मीनं पुष्पाला दिलेल्या माहितीनुसार, सुमितनंच किट्टूची हत्या करुन तिचा मृतदेह शेतात गाडला.

मेरठच्या टिपी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुल्तान नगरमध्ये ही घटना घडली. धीरेंद्र सिंह यांची पत्नी पुष्पा रुग्णालयात काम करते. जानेवारी २०२३ च्या रात्री धीरेंद्र यांची पत्नी ब्रह्मपुरीतील नर्सिंग होममध्ये ड्युटीवर होती. घरात धीरेंद्र आणि त्यांची ५ वर्षांची मुलगी मानवी ऊर्फ किट्टू होती. रात्री ११ वाजता किट्टू घरासमोरची गेटची कडी उघडून बाहेर गेली आणि तिथे ३० सेकंद उभी राहिली. तितक्यात तिथे एक तरुण आला आणि किट्टूला उचलून घेऊन गेला. पोलिसांनी किट्टूचा शोध घेतला. पण ती सापडली नाही. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं. त्यात एक तरुण किट्टूला उचलून नेताना दिसला. पण त्याची ओळख पटू शकली नाही.

किट्टूच्या कुटुंबियांनी आशा सोडली नव्हती. किट्टू परत येईल, अशी भाबडी आशा तिच्या आईला होती. पण २ वर्षे किट्टूचा शोध लागला नाही. पोलिसांचे हात रिकामे असताना या प्रकरणात वेगळं वळण आलं. पुष्पा यांच्या घरात भाड्यानं राहणारी रश्मी तिला भेटायला गेली. तुमच्या लेकीला सुमितनं मारलं आणि तिचा मृतदेह शेतात पुरला, असं रश्मीनं सांगितलं. ते ऐकून पुष्पाच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं लगेच पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यांना घडलेला प्रसंग सांगितला.पोलिसांनी सुमितला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. त्यात सुमितनं सगळा प्रकार सांगितला. ‘दोन वर्षांपूर्वी पुष्पानं माझ्या वहिनीला काहीतरी खायला दिलं होतं. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. मला त्याचा बदला घ्यायचा होता. त्यामुळेच मी पुष्पाच्या लेकीचं अपहरण करुन तिची हत्या केली आणि मृतदेह शेतात गाडला,’ अशी माहिती सुमितनं पोलिसांना दिली.आता पोलीस किट्टूचा मृतदेह शोधत आहेत. सुमितनं सांगितलेल्या जागी पोलीस बुलडोझरनं खोदकाम करत आहेत. पण अद्याप तरी किट्टूचा मृतदेह सापडलेला नाही. किट्टूचं अखेरचं दर्शन व्हावं, अशी इच्छा तिचे वडील धीरेंद्र यांनी व्यक्त केली. ‘सुमित खोटं बोलत आहे. त्याच्या वहिनीचा गर्भपात झालाच नव्हता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे,’ असं धीरेंद्र म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.