रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्याच्या आवारात कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांस, झीशान उलहक वसीम सातारकर (25) व सर्वेश सुनिल ठाकूर या दोघांनी मारहाण करीत जखमी केल्याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.राज्यात पोलिसांना मारहाण केल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असतात. अशातचं आता रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. रेवदंडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे हे पोलीस, बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई करीत असताना मुरुड तालुक्यातील बोर्ली विभागातील दोन आरोपींनी धक्काबुक्की करून मारहाण करीत जखमी केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे.रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्याच्या आवारात कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांस, झीशान उलहक वसीम सातारकर (25) व सर्वेश सुनिल ठाकूर या दोघांनी मारहाण करीत जखमी केल्याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.










