ऑनलाइन क्रिकेट बेटिंगसाठी वेगवेगळ्या बँकांच्या 38 खात्यांचा वापर; तीन कुख्यात बुकींना बेड्या, सापडलं मोठं घबाड.

भारताने रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025  जिंकल्यानंतर भारताने दुबईत तिरंगा फडकवला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. याच सामान्यादरम्यान सट्टा बाजरात ही चांगलीच उसंत असल्याचे पुढे आले आहे. अशाच एका ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचा भांडाफोड करत गुन्हे शाखेने तीन कुख्यात बुकींना अटक केली आहे.विशेष म्हणजे या आरोपींनीऑनलाइन क्रिकेट बेटिंगसाठी वेगवेगळ्या बँकांच्या 38 खात्यांचा केला वापर, आयडी-पासवर्ड देऊन लोकांकडून या खात्यांमार्फत केले जात होते आर्थिक व्यवहार, स्थानिक गुन्हे शाखेने हे सर्व अकाउंट सिझ केले असून या खात्यांमधली 60 लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, पारस उखाडे, अविनाश हांडे आणि राकेश कोंडावार अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावं आहेत. शिवाय याआधी देखील यांच्यावर क्रिकेटवर सट्टा आणि बॅटिंग केल्याचा गुन्हा दाखल असल्याची ही माहिती आहे.

क्रिकेटवर बेटिंग करण्यासोबतच ऑनलाइन सट्टा खेळण्यासाठी इतर लोकांना हे तिघं आयडी-पासवर्ड देऊन पैसे घेत होते. आरोपींकडून पाच मोबाईल आणि 27 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे विशेष म्हणजे या आरोपींनी ऑनलाइन क्रिकेट बेटिंग साठी वेगवेगळ्या बँकांच्या 38 खात्यांचा केला वापर, आयडी-पासवर्ड देऊन लोकांकडून या खात्यांमार्फत केले जात असल्याचे ही पुढे आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सध्या करत आहेत. मात्र या कारवाईमुळे सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.चंद्रपुरच्या ज्या बारमधील भांडणात पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला तो पिंक पैराडाईज बार अँण्ड रेस्टॉरेंट आता सील करण्यात आला आहे. सिटी पोलीस स्टेशने ही कारवाई केली आहे. शुक्रवारी पिंक पैरेडाईज बारसमोर युवकांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.

बार समोर बांधकाम साहित्य, रेती, गिट्टी, बल्ली, फाटे ठेवल्यामुळे बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वाहने ठेवण्यास पार्कंग व्यवस्था नसल्याने आणि  वाहने रोडवर उभ्या असल्याने सार्वजनीक वाहतुकीस कोंडी निर्माण होऊन सर्वसाधारण नागरीकांना अडथळा व गैरसोय होत होती.  तसेच या बार मध्ये वारंवार झगडा-भांडण होऊन त्याचे रूपांतर खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात घडल्याने कायदा व सुव्यवथेचा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी परिसरातील नागरीकांच्या मागणीवरून हा बार सीलबंद करण्यात आलाय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.