होळीचा उत्साह असलेले डोळे अश्रूंनी डबडबले; होलिका दहनासाठी लाकूड घ्यायला गेला अन्… नागपुरात भयंकर घडलं.

सध्या सर्वत्र होळीच्या सणाचा उत्साह आहे. मात्र, नागपुरात होळीच्या दोन दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे होलिका दहनासाठी लाकडं आणाला गेलेल्या एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.होळिका दहनाच्या तयारीदरम्यान नागपुरात एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान-कांद्री येथे होलिका दहनासाठी लाकूड आणताना एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावात होळीच्या सणाला शोककळा पसरली आहे.याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कांद्री परिसरातील काही मुलं होळी साजरी करण्यासाठी आवश्यक लाकूड गोळा करण्यासाठी जवाहरलाल नेहरू रुग्णालयाच्या परिसरात गेले होते. त्यांच्या सोबत १२ वर्षीय सोनू कश्यप देखील गेला होता. लाकडाचे ओझे उचलताना संतुलन बिघडलं आणि मोठ्या प्रमाणात लाकडं सोनूच्या अंगावर कोसळले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य करत जखमी सोनूला जवाहरलाल नेहरू रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आले आणि उपचारादरम्यान सोनूचा मृत्यू झाला.या घटनेने संपूर्ण कांद्री गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, घरातील मुलगा गेल्याने कश्यप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावकरी आणि नातेवाईकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमधून हळहळ आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून अधिकृत तपास सुरू केला आहे. या निमित्ताने लहान मुलांनी मोठ्या प्रमाणावर लाकडांची वाहतूक करताना विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे. पालक आणि स्थानिक नागरिकांनी मुलांवर योग्य देखरेख ठेवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता येतील. सणाच्या उत्साहात सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज आहे, अन्यथा अशा दुर्दैवी घटनांमुळे आनंदाचा सण दुःखात परिवर्तित होऊ शकतो.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.