नव्या कारच्या पूजेसाठी मंदिरात, त्याच कारच्या खिडकीत अडकून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू.

नवी गाडी घेतली आणि त्या गाडीच्या पुजेसाठी संपूर्ण कुटुंब मंदिरात गेलं. मात्र, त्याच कारच्या खिडकीत अडकून चिमुकल्याचा जीव गेला. या घटनेने आनंद साजरा करणाऱ्या या कुटुंबात शोककळा पसरली.नव्या कारची पूजा करण्यासाठी कुटुंबासह देवी मंदिरात आलेल्या एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. या चिमुकल्याची मान गाडीच्या खिडकीत अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ चिमुकल्याला त्याच वाहनातून मढ येथील रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेमुळे अवघ्या काही तासांतच कुटुंबीयांच्या आनंदावर शोककळा पसरली.हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बलिया येथील उभांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चकिया गावातील असल्याची महिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.उभांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकिया गावात राहणारे रवी ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी नवीन बलेनो कार खरेदी केली होती.

घरात नवीन गाडी आल्याने संपूर्ण कुटुंब खूप आनंदात होते. कुटुंबातील सर्व सदस्य एकाच गाडीत बसून सोमवारी देवीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचले होते. मंदिरात पोहोचल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य गाडीतून खाली उतरले आणि पूजेच्या तयारीला लागले. दरम्यान, रवी ठाकूर यांचा दीड वर्षांचा मुलगा रेयांश आईसोबत गाडीतच बसून राहिला.तेव्हा गाडीच्या चारही खिडक्या उघड्या होत्या आणि हा चिमुकला खिडकीतून बाहेर डोकावत होता. इतक्यात त्याच्या हाताने खिडकी बर-खाली करणारे बटण दाबले गेले आणि ऑटोमॅटिक गाडीच्या काचा वर येऊ लागल्या. यामुळे मुलाची मान खिडकीच्या काचेत अडकली. मुलगा अचानक ओरडू लागला तेव्हा कुटुंबाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. रवी ठाकूरही धावत आले आणि त्यांनी काच खाली केली. मात्र, तोपर्यंत मुलगा गंभीर जखमी झालेला होता. त्यानंतर त्याला तात्काळ त्याच वाहनातून रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला तातडीने मोठ्या रुग्णालयात रेफर केले.

रवी यांनी तात्काळ मुलाला त्याच वाहनातून मढ रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी मुलाला तपासून मृत घोषित केले.या घटनेनंतर रवीच्या पत्नीने एकच आक्रोश केला. संपूर्ण कुटुंब रडायला लागलं. रवीचा भाऊ रोशन ठाकूर याने सांगितले की, तो कारची पूजा करण्यासाठी माता राणीच्या मंदिरात गेला होता. कारमधून बाहेर डोकावणाऱ्या मुलाची मान खिडकीच्या काचेत अडकली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सारेच हादरुन गेले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.