संतोष देशमुख प्रकरणी उद्या महत्वाची सुनावणी, आरोपींच्या जबाबात सत्य उलगडणार.

बीडमधील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या हत्येला आता तीन महिने उलटून गेले आहेत. सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर बुधवारी केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.बीडमधील मस्सोजाग गावचे सरपंचसंतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या हत्येला आता तीन महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणाची सध्या न्यायलयीन, एसआयटी आणि सीआयडी अशी त्रिकोणी चौकशी सुरु आहे. तर एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातच सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले. यामधून धक्कादायक खुलासे झाले आहेत. खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले आहे. तर हत्येवेळीचे जे फोटो दोषारोपपत्रातून समोर आले आहेत, त्याने साऱ्यांचाच थरकाप उडाला आहे. राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या हत्येप्रकरणी बुधवारी १२ मार्चला केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराडच असल्याचे स्पष्ट होत आहे. तर अन्य प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम चाटे यांचा आता जबाब आता लिफाफ्याद्वारे न्यायालयात सादर केला जाणार आहे. आरोपींचे जबाब आधी दोषारोप पत्रात जोडण्यात न आल्यानेलिफाफ्याद्वारे ते सादर केले जाणार आहेत. यासोबतच वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज देखील न्यायालयात दाखल केला जाण्याची शक्यता आहे.दरम्यान देशमुख कुटुंबीय देखील दु:खात बुडाले असून ते याप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा दिली तरच आम्हाला न्याय मिळेल, अशी भूमिका घेतली आहे. देशमुख कुटुंबीयसह जिल्ह्यातील आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी हे प्रकऱण लावून धरले आहेत. तर त्यांच्यांकडून आतापर्यंत अनेक आरोप करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.सुनावणीकडे सर्वांचे लक्ष


हत्येप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर बुधवारी महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. महत्वाची या कारणासाठी की प्रमुख आरोपींचे जबाब कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत. या सहा प्रमुख आरोपींचे जबाब १८ प्रमाणे घेण्यात आले आहेत. तर साक्षीदारांचे १६४ प्रमाणे जबाब घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप आरोपपत्रात जोडण्यात आले नाही. बुधवारी न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये आरोपींचे हे जबाब सादर केले जातील. या सुनावणीत नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.