शिरूरकासार येथील गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्याने २०० हरण्यांची शिकार केली आहे असा आरोप आहे. सतीश भोसले याने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोसलेची प्रॉपर्टी जप्त करण्याची मागणी आता करण्यात आलीये.बीडच्या शिरूरकासार येथील गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्यावर सातत्याने गंभीर आरोप होताना दिसत आहेत. खोक्याने आतापर्यंत तब्बल २०० हरण्यांची शिकार केल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर त्याचे बेदम मारहाणीचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यानंतर मोठी खळबळ माजली. सतीश भोसले बॅटने एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसला. आता सतीश भोसले याचे नवनवीन कारनामे उघड होताना दिसत आहेत. सतीश भोसले याच्यामुळे आमदार सुरेश धस यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत.
सतीश भोसलेची दहशत इतकी जास्त की, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या ढाकणे कुटुंबियांची साधी तक्रार देखील पोलिसांनी घेतली नाही. सोशल मीडियावर क्रूर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. गेल्या काही दिवसांपासून खोक्याच्या शोधात पोलिस आहेत. मात्र, तो अजूनही फरार आहे. फरार असतानाच त्याने tv9 ला मुलाखत दिली. लोक पोलिसांवर आरोप करताना देखील दिसत आहेत.सतीश भोसले याची संपत्ती करोडोंच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. आता सतीश भोसले याची संपत्ती जप्त करण्याची थेट मागणीच केली जातंय.









