भीम आर्मी भारत एकता मिशनच्या जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.

भीम आर्मी भारत एकता मिशनच्या जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. भीम आर्मी भारत एकता मिशन व आजाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तसेच लोकसभा खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जळगाव जिल्हा प्रमुख गणेश भाई सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पद्मालय गेस्ट हाउस, जळगाव येथे जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमात सरदार बलदार तडवी यांची जिल्हा उपाध्यक्ष, फिरोज अब्बास तडवी यांची जिल्हा सचिव, तर राहुल लक्ष्मण जयकर यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे, संदीप सपकाळे, जावेद शेख,

हेमराज भाऊ तायडे, रावेर तालुका अध्यक्ष राहुल निंभोरे, रावेर तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी, तसेच मल्हार भाऊ, शकील भाई, विशाल भाऊ, सूरज भाई, कलीम दादा आदी मान्यवर उपस्थित होते.
या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यात संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल व सामाजिक न्यायासाठीची चळवळ अधिक जोमाने पुढे नेली जाईल, असा विश्वास गणेश भाई सपकाळे यांनी व्यक्त केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.