दोन दिवसांपूर्वी ज्याचा बर्थडे साजरा केला, त्याच लेकासमोर बाप रेल्वेखाली, काळीज चिरणारी घटना.

 जळगावात एका वडिलांचा त्यांच्या मुलासमोरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेल्वे पकडताना तोल जाऊन थेट रेल्वेच्या चाकाखाली आल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.रावेर येथे जाण्यासाठी कामयानी गाडीत चढताना तोल गेला आणि चाका खाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनिल जाधव असं या व्यक्तीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी सासरवाडीला मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाधव परिवार आले होते. त्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.जळगाव रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वे चढत असताना तोल गेल्याने एका ३९ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अनिल जाधव हे रावेर शहरात पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते.

मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासरवाडीला पत्नी व मुलासोबत आलेले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी १० मार्च रोजी रात्र ९ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर रावेर येथे जाण्यासाठी आले होते.रात्री ९ वाजता आलेली कामयानी एक्सप्रेसमध्ये चढत असताना त्यांचा तोल गेल्याने ते रेल्वेखाली आले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस सासरवाडी येथे पत्नीसह परिवार जळगाव येथे आले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर पुन्हा रावेर येथे जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर रात्री नऊ वाजेच्या सुमारास कामाने एक्सप्रेसमध्ये चढताना त्यांचा तोल गेला आणि चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांसाठी मुलाचा वाढदिवस हा अखेरचा ठरला. डळ्यादेखत पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने मोठा आक्रोश केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.