कुख्यात गुंड गजा मारणे सांगली कारागृहात, मोक्का कारवाईनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मंत्र्यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात अटक करून मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगलीतील जिल्हा कारागृहात आणण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मात्र एवढ्या मोठ्या गुंडाला सांगलीच्या कारागृहात हलवण्याबाबतचे कारण समजू शकलेले नाही.कोथरूड परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केली होती. भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेल्या तरुणाला झालेल्या या मारहाणीनंतर पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले होते. गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला. त्यानंतर गजा मारणेला आज ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मारणे याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कोथरुड परिसरात १९ फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान फिर्यादी देवेंद्र जोग यांनी स्वतः कोर्टात हजर राहून कोणीही चिथावनी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. गजा मारणेला पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात सोमवारी रात्री उशिरा अटक केली होती आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची बडदास्त न ठेवता थेट मांडी घालून त्याला जमिनीवर बसवले होते. तसंच ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१), अमोल विनायक तापकीर (३५, तिघेही रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना अटक केली होती. आरोपींपैकी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा गजा मारणे याचा भाचा आहे. तर रुपेश मारणे आणि गजा मारणे या दोघांनादेखील पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केले आहे.गजा मारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २८ गुन्हे दाखल आहेत. पुढे एकेकाळचा मित्र असलेला नीलेश घायवळ याच्याशी गजा मारणेचे शत्रुत्व निर्माण झाले. बाबा बोडके याच्याशी देखील त्याचे शत्रुत्व निर्माण झाले. त्यातून या टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.