याला धाडसीपणा म्हणावं की मुर्खपणा? मुलं उड्या मारण्यासाठी दोरी ऐवजी वापरताहेत साप, या व्हायरल व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण.आपल्यापैकी अनेकांनी लहान असताना दोरीच्या उड्या मारल्या असतील. दोरी उड्या हा निव्वळ खेळ नसून खूप चांगला व्यायाम देखील आहे. नियमित उड्या मारल्यास हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होते. एवढंच नाही तर हाडांची घनता वाढविण्यात आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते. पण आता तुम्हाला आम्ही एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्ही डोक्याला हातच लावाल. या व्हिडीओमध्ये मुलं दोरी उड्या मारत आहेत. पण त्यांनी या उड्या मारण्यासाठी चक्क सापाचा वापर केलाय.










