शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शिर्डी पुन्हा हादरली आहे. मुलाने केलेल्या जबर मारहाणीमुळे वडिलांना जीव गमवावा लागला आहे.शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शिर्डी पुन्हा हादरली आहे. घरगुती वादातून मुलाकडून वडिलांना पाईपने जबर मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये शिर्डी पोलिसांनी स्वत:च तक्रारदार होऊन कायदेशीर कारवाई करत आहेत. आरोपी मुलगा शुभम दत्तात्रय गोंदकर याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.वृत्तानुसार, ६ मार्चच्या घडलेल्या या घटनेचा पाच दिवसांनंतर उलगडा झाला आहे. सुरुवातीला दत्तात्रय गोंदकर यांचा आकस्मिक मृत्यू असल्याचे भासवण्यात आले.










