श्री जितेंद्र केवलसिंग पाटील ( आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.अध्यक्ष) यांना “”आरोग्यदूत सेवारत्न पुरस्कार“”देऊन सम्मानित करण्यात आले…

शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले तोरणा येथे हिंदवी स्वराज्याचे तोरण उत्सव ऐतिहासिक विजय दिवस सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तरी शिवशंभूभक्तांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी व हिंदवी स्वराज्याचा पहिला विजय दिवस साजरा करण्यासाठी शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला प्रमुख पाहुणे तानाजी मालुसरे ( नरवीर सुभेदार ) यांचे 13 वंशज  कुणाल दादा मालुसरे आणि येसाजी कंक ( सरसेनापती ) यांचे वंशज  राजेंद्रभाऊ रामभाऊ कंक आणि शिवशंभु संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष  महादेव दादा पवार यांचा हातून श्री जितेंद्र पाटील यांना आरोग्य क्षेत्रात उलखनीय कार्य केल्याबद्दल “”आरोग्यदूत सेवारत्न पुरस्कार “” देऊन सामाणित करण्यात आले आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष  जितेंद्र पाटील यांना जिजाऊ माता, छत्रपती शिवाजी महाराज ,श्री शंभूराजे यांचे पूजन करून पालखी चा मान भेटला.


आपण समाजाचे आणि राष्ट्राचे एक जबाबदार घटक असुन समाज ऋण व राष्ट्र ऋण फेडण्याचे महनीय कार्य करीत आहात. आपल्या कार्य कर्तुत्वद्वारे सदैव राष्ट्राभिमान जागृत व्हावा व ज्ञानवृद्धी होऊन देशाला प्रगतीपथाकडे नेण्यास आपले योगदान सदैव लाभावे, अशा भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या. सामाजिक क्षेत्रातील अतिशय उत्तम अशा कामगिरीसाठी व सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून जनसेवा हीच ईश्वरसेवा याचे समाजासमोर मुर्तिमंत उदाहरण असल्याचे आपल्या कार्याने दाखवुन दिल्याने सदर पुरस्कारासाठी आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींकडुंन जितेंद्र पाटील यांचे नाव सुचविण्यात आले होते. कोरोनाव्हायरस सारख्या संसर्ग आजारामुळे जनता भयभीत झालेले असतांना अशा संकटसमयी मोफत जेवण उपलब्ध करून देणे, धान्य, शिधा व गरजेच्या वस्तु मोफत वाटप करणे, रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे, अतिशय अल्प दरात रुग्णवाहिका सेवा ऊपलब्ध करून देणे, अनाथ आश्रमामधिल मुलांना दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण पुरविणे, अपंगांना जयपूर फूट, कॅलिपर सायकल वाटप करणे. अशा आणि यासारख्या विविध उल्लेखनीय कामगिरीसाठी जितेंद्र पाटील यांना आत्तापर्यंत 5 आंतरराष्ट्रीय आणि 151 राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहे.
सदर पुरस्कार जितेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आल्याने उत्तम कार्य करणाऱ्या व योग्य व्यक्तीला देण्यात आल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.