वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो.

 लातूरमधील गुंजर्गा या गावातील एक विद्यार्थ्याचा शाळेत विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरवर्षी शाळेमध्ये स्नेहसंमेलन घेतले जातात. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धा यासोबतच विविध खेळांचेही आयोजन केले जाते. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये स्नेहसंमेलनाचे आकर्षण पाहायला मिळते. मात्र शाळेच्या याच स्नेहसंमेलनाच्या तयारीवेळी लातूर जिल्ह्यातील गुंजर्गा या गावात सातवीत शिकणाऱ्या कृष्णा दत्ता शिंदे या शाळकरी मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.शाळेच्या आवारात स्नेहसंमेलनाची तयारी करत असताना भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या लोखंडी खांबाला स्पर्श होताच विद्यार्थ्याला जोरात विजेचा धक्का बसला. या धक्क्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना निलंगा तालुक्यातील मौजे गुंजरगा इथे सायंकाळी सहा वजेच्या सुमारास स्नेहसंमेलनाची तयारी चालू असताना घडली आहे.कृष्णा दत्ता शिंदे, वय १२ वर्षे, रा. गुंजरगा ता. निलंगा जिल्हा लातूर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा तो विद्यार्थी होता. या शाळेत स्नेहसंमेलन असल्याने शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास बोलावले होते.कृष्णा शिंदे हा शाळेत आला, शाळेच्या आवारात स्नेहसंमेलनासाठी उभ्या केलेल्या लोखंडी खांबाला त्याचा स्पर्श झाला, त्यात वीजप्रवाह प्रवाहित असल्याने त्याला जोरात विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. विद्यार्थ्याला तेथील शिक्षकांनी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.मृत कृष्णा शिंदे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्याचे आईवडील शेतीची कामे करून उदरनिर्वाह करतात. मृत कृष्णा याची निलंगा येथील शाळेत शिकण्याची इच्छा होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्याला गावातील शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली.या शाळेत मुख्याध्यापक म्हणून पणबोने यांच्यासह अनेक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र हे शिक्षक मुख्यालयी राहात नसून, ते रोज निलंगा येथून ये – जा करतात. शाळेत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला असून सदर प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांत जोर धरत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.