विवाहितेचा संशयितरित्या खून, सासरच्यांनी शव शौचालयाच्या टाकीत लपवला; ३ दिवसांनंतर एका कॉलने गुढ उकललं.

 बिहारमधून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. विवाहित महिलेची तिच्या सासरच्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे तिचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत आढळून आला आहे.बिहारमधून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. विवाहित महिलेची तिच्या सासरच्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे तिचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून महिलेच्या पतीला आणि सासूला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, बिहारच्या असरगंज पोलीस ठाणे हद्दीतील साजुवा गावातील कुशवाह टोला येथे ही घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव अनिशा भारती असे आहे. सजुआ येथे राहणाऱ्या आशिष कुमार याच्याशी दोन वर्षांपूर्वी तिचा प्रेमविवाह झाला होता. अनिशा, तिचे पती आणि सासरच्या लोकांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येते.अनिशा माहेरी गेली होती. ६ मार्चला ती सासरी परतली. पण त्यानंतर अनिशाच्या पालकांना तिची कोणतीही खबर समजली नाही.

त्यांना चिंता वाटू लागली यासाठी तिच्या माहेरच्यांनी तिचे सासर असलेले साजुवा गाव गाठले. पण तिथे त्यांना अनिशाबद्दल काहीच माहिती समजली नाही. आपल्या मुलीची कोणतीच खबर नसल्याने तिचे आई वडिल चिंतेत बुडाले. त्यांनी असरगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अनिशाच्या पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. परंतु आशिषने पत्नीच्या सासरी परतण्याच्या गोष्टीला नकार दिला आणि अनिशा कोणासोबत तरी पळून गेली आहे, असे आशिषने पोलिसांना सांगितले.यानंतर तिचे पालक निराश होऊन घरी परतले. त्यानंतर ९ मार्चच्या रात्री एका शेजाऱ्याने अनिशाच्या पालकांना फोन करून सांगितले की, आशिषने अनिशाची हत्या करून तिचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत फेकून दिला आहे. ही माहिती मिळताच मृताच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत आशिषच्या घरावर छापा टाकला आणि शौचालयाच्या टाकीतून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंगेरला पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आशिष कुमार आणि त्याच्या आईला अटक केली आहे. मुंगेरचे एसपी सय्यद इम्रान मसूद म्हणाले की, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.