“त्याला सोडू नका अन्यथा तो आणखी असेच उद्योग करेल” आईने केली मुलाची तक्रार, उच्च शिक्षित तरुणाचं विकृत कृत्य.

 दुचाकींना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचे मध्यरात्री समजल्यानंतर सोसायटीतील रहिवाश्यांनी इमारतीतील सिसिटीव्ही तपासला. सिसिटीव्हीमध्ये ही वाहने सोसायटीमध्ये रहिवाशी असलेल्या स्वप्नील पवार याने पेटवल्याचे दिसून आले.पुण्यातील भर रस्त्यात लघुशंका आणि अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजाची घटना ताजी असतानाच, पिंपरी चिंचवडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नेशसाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने रागाच्या भरात सोसायटीमधील १३ दुचाकी जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वप्नील शिवशरण पवार असे या नशेबाज तरुणाचे नाव असून पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळेनीलख भागात हा प्रकार घडला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील पवार हा तरुण उच्चं शिक्षित आहे. मात्र तो मोठ्या प्रमाणावर व्यवसानाच्या आहारी गेला आहे. आईने नशेसाठी पैसे न दिल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात सोसायटीमधील वाहने पेटवून दिली. दुचाकींना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचे मध्यरात्री समजल्यानंतर सोसायटीतील रहिवाश्यांनी इमारतीतील सिसिटीव्ही तपासला.

सिसिटीव्हीमध्ये ही वाहने सोसायटीमध्ये रहिवाशी असलेल्या स्वप्नील पवार याने पेटवल्याचे दिसून आले. त्यानंतर सोसासटीमधील नागरिकांनी त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
याबाबत संबंधित मुलाच्या पालकांनी देखील पोलिसांकडे तक्रार केली आहे. आमचा मुलगा उच्चशिक्षित आहे. मात्र तो व्यसनाच्या आहारी गेल्याने असे कृत्य करतो. तसेच पैसे न दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे स्वप्नीलच्या आईने म्हटले आहे. त्याला सोडू नका अन्यथा तो आणखी असेच उद्योग करेल, अशी विनंतीही त्याच्या आईने पोलिसांकडे केली आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतांनाच पहायला मिळत आहेत. मात्र अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी नागरिकांसहीत पोलिसांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, ट्र्रॅफिक सिग्नलवर लघुशंका आणि अश्लिल वर्तन करणाऱ्या गौरव अहुजाची पोलिसांनी धिंड काढली आहे. पैशाचा माज असणाऱ्या आणि समाजासाठी घातक ठरणाऱ्या अशा विकृत तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करुन त्यांना वठणीवर आणण्याची मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.