तू मला खूप आवडतेस… आरोपी पाठलाग करत थेट घरात घुसला, अल्पवयीन मुलींचा विनयभंग, टिटवाळ्यात खळबळ.

टिटवाळ्यात दोन अल्पवयीन मुलींचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.टिटवाळ्यातील एका व्यक्तीने रविवारी संध्याकाळी घरात घुसून दोन शाळकरी अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विनयभंग केल्यानंतर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हा दोघींना मी शाळेमधून उचलून नेईन, अशी धमकी दिली आहे. या विनयभंग प्रकरणी एका पीडितेच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलीस ठाण्यात बाल लैंगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने संबंधिता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग करणारा हेमंत पवार हा कल्याण तालुक्यातील घोटसई गावात राहणारा असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. एक पीडित तरूणी १४ वर्षाची, तर एक १२ वर्षाची आहे. पीडितेचे कुटुंब मजुरी करून उपजीविका करते.पीडितेने टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आपण राहत असलेल्या घराच्या परिसरात रोहित पवार याचे चायनिजचे दुकान आहे. या दुकान मालक रोहितचा भाऊ हेमंत पवार हा तेथे दररोज येत असतो.

त्यामुळे आपली त्याच्याशी तोंड ओळख होती. गेल्या तीन दिवसांपासून आपण शाळेत जात असताना चायनिज दुकान मालकाचा भाऊ हेमंत आपण शाळेत जात असताना आपल्या पाठीमागे येत असल्याचे निदर्शनास आले.
चायनिज दुकान मालकाचा भाऊ हेमंत पवार हा शाळेत जाताना पाठलाग करत असे. रविवारी सायंकाळी साडे सात वाजता हेमंत पवार आपल्या घरात आला. तू घरात का आलास? असा जाब विचारला. त्यावेळी त्याने तू मला खूप आवडतेस, असे बोलून त्याने हात पकडला. आपण त्याचा हात झडकून घरातून निघून जाण्यास सांगितले.
हा प्रकार सुरू असताना पीडितेची अल्पवयीन मावस बहीण घरात आली. तिने घरात काय सुरू आहे, असा प्रश्न केला. त्यावेळी हेमंत याने मावस बहिणीच्या खांद्यावर हात टाकून तिला सुध्दा तू मला खूप आवडतेस, असे बोलून तिच्या हाताला पकडून स्वयंपाकघरापर्यंत ओढत नेले.

घरात घडलेला प्रकार तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना सांगितला तर तुम्हाला तुमच्या शाळेमधून उचलून घेऊन जाईन अशी धमकी त्याने दोघींना दिली. त्यानंतर घरातील सोफ्यावर जबरदस्तीने झोपला. तेथे त्याने त्यांचे दोन्ही मोबाईल फोडले. ते उचलून घेऊन निघून गेला.अशा पद्धतीने घडल्या प्रकाराने पीडित दोन्ही बहिणी घाबरल्या होत्या. यातील एका पीडितेची आई रात्री मजुरी करून घरी आली. त्यावेळी तिने घरात घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने दोन्ही पीडित बालिकांसह टिटवाळा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने हा गुन्हा दाखल करून घेतला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांनी सुरू केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.