पुण्यातील डी मोरा पबमध्ये दोन तरुणींचा जुन्या वादातून काही टवाळखोरांनी पार्किंगमध्ये विनयभंग केला आणि शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये श्रीधर काळे, ओंकार दळवी आणि प्रतीक यांचा समावेश आहे. या घटनेवर पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध डी मोरा पबमध्ये आलेल्या दोन तरुणींचा जुन्या वादातून काही टवाळखोरांनी पार्किंगमध्ये विनयभंग केला. त्यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार रात्री 1 वाजण्याच्या नंतर घडल्यामुळे “पब मालकांना फक्त तंबी देऊन सोडले का?” असा प्रश्न पोलीस आयुक्तांना विचारला जात आहे. हा प्रकार दि. १० च्या मध्यरात्री घडल्याचे समजते. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात श्रीधर काळे, ओंकार दळवी आणि प्रतीक तीन आरोपींवर गुन्हा नोंदवला गेला आहे. फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार, दि. ९ रोजी फिर्यादी आणि तिची मैत्रीण डी मोरा हॉटेल (पब) मध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. त्याच वेळी आरोपी श्रीधर काळे आणि त्याचे दोन मित्रही तिथे उपस्थित होते.पबमध्ये असताना श्रीधर काळे याने फिर्यादीला धक्का दिला. त्यावर तिने जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ करत अश्लील इशारे केले. त्यानंतर रात्री २ च्या सुमारास, पबमधून घरी जात असताना आरोपींनी पार्किंगमध्ये जाऊन फिर्यादीला अडवले आणि “तू येथे काय करत आहेस?” असा सवाल केला. यावेळी श्रीधर काळेने फिर्यादीचा हात पिरगळला आणि तिला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला.









