दादर स्टेशनबाहेर शुभेच्छांचा बोर्ड घेऊन उभ्या मराठी तरुणाला विरोध, प्रख्यात दुकान मालकाने अडवल्याचा आरोप.

होळी शिमगाचा मेसेज बॅनर घेऊन मराठी तरुण दादरमधील प्रसिद्ध दुकानाच्या बाहेर उभा होता, पण त्याला तिथे उभे राहू दिले नाही, तर जागे व्हा आज ही परिस्थिती आहे, तर उद्या काय? असा प्रश्न महिलेने व्हिडिओ शेअर करत विचारला आहेदादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या कपड्यांच्या प्रख्यात दुकानाबाहेर एक तरुण हातात मराठी शुभेच्छांचा संदेश घेऊन उभा होता. मात्र आपल्याला इथं उभं राहण्यास दुकान चालकांनी विरोध केल्याचा दावा तरुणाने केला आहे. इन्स्टाग्रामवर यासंदर्भात व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात मराठी-अमराठी वाद उफाळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संबंधित दुकान मालक, चालक किंवा पोलीस यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.असे इन्स्टाग्राम हँडल असलेल्या इन्फ्लुएन्सर महिलेने यासंदर्भात दावा केला आहे. अंधेरीचा राहणारा ओमकार मटकर हा तरुण मराठी संस्कृती जपतो. प्रत्येक सणावाराला तो मराठी शुभेच्छांचे वेगवेगळे मेसेज असलेले बॅनर हातात घेऊन दादरला उभा राहतो. कारण इथे मराठी लोकांची गर्दी असते. कारण मराठी संस्कृती जपण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

मात्र नुकतंच एका प्रसिद्ध दुकानाच्या समोरील रस्त्यावर उभे राहण्यास त्याला मज्जाव करण्यात आला, असे या महिलेने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. दुकानापासून बरेच अंतर आहे आणि रस्ता सार्वजनिक आहे, पोलीसही त्यांना सहकार्य करत नाहीत, असेही महिलेने म्हटले आहे.दादरमधील फेमस दुकान, हा आहे ओमकार… तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करणारा. आपली परंपरा संस्कृती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जपण्यासाठी प्रयत्न करणारा.

नेहमीच तो छान मेसेजचे बॅनर घेऊन दादरला उभा राहतो फक्त १० मिनिटांसाठी ते सुद्धा सण समारंभ असतात तेव्हाच. काल पण तो होळी शिमगाचा मेसेज बॅनर घेऊन उभा होता, पण त्याला तिथे उभे राहू दिले नाही, तर जागे व्हा आज ही परिस्थिती आहे, तर उद्या काय? असा प्रश्न महिलेने व्हिडिओला कॅप्शन देत विचारला आहे. मात्र संबंधित दुकान किंवा पोलिसांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.मराठी-अमराठी वाद उफाळण्याची ही मुंबई परिसरातील पहिलीच वेळ नाही. याआधी गिरगाव, कल्याण, मुंब्रा यासारख्या भागातही असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.