बाबांनी कधी मुंग्यांवर पावडर टाकू दिली नाही, संतोष देशमुखांचा हळवेपणा, लेक वैभवी भावूक.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यांच्या लेकीला वडिलांच्या हळव्या स्वभावाची आठवण झालीये. वडिलांबद्दलचा किस्सा सांगताना वैभवी देशमुख ही भावूक झाल्याचे बघायला मिळाले.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दररोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. देशमुखांच्या हत्येवेळचे अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारी काही फोटो पुढे आली, ज्यानंतर राज्यात संतापाची लाट आल्याचे बघायला मिळाले. या व्हायरल होणाऱ्या फोटोंनंतर धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनाम्यासाठीचा दबाव वाढला आणि मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर सुरूवातीपासूनच अनेक गंभीर आरोप केली गेली. सीआयडीच्या आरोपपत्रात मुख्य आरोपी म्हणून कराडचे नाव आहे.काल संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाली.

बारामतीमध्ये मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, देशमुख कुटुंबिय देखील होते. यावेळी संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख ही बोलताना भावूक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी तिने आपले वडील किती जास्त हळव्या मनाचे होते हे सांगितले. यावेळी वैभवीच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.वैभवी देशमुख म्हणाली की, एकदा आमच्या घरात मुंग्या झाल्या होत्या. पण माझ्या वडिलांनी आईला त्या मुंग्यांवर पावडर टाकू दिली नाही. उलट त्यांनी त्या मुंग्यांना चिकटपट्टी भिंतीवर लावून जाण्यासाठी मार्ग करून दिला. इतके जास्त हळवे आणि संवेदनशील माझे वडील होते. हा सर्व किस्सा सांगताना वैभवी देशमुख ही भावूक झाल्याचे बघायला मिळाले. वडिलांच्या न्यायासाठी लढताना वैभवी देशमुख ही दिसत आहे. यावेळी बोलताना तिने काही प्रश्नही उपस्थित केली.संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीही काही आरोप केले आहेत. धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे की, मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांना देखील सहआरोपी करा, अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडून केली जात आहे. आरोपपत्रात त्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.