ठाकरे-शिंदे आमनेसामने, पण नजरेला नजर न भिडवताच निघून गेले; विधानसभेच्या गॅलरीत काय घडलं?

विधानसभेत आज महायुती सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यानंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीस, शिंदे, अजित पवार एकमेकांसमोर आले.राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महायुती सरकार २.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवारांनी कृषी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काही घोषणा केल्या. तसेच, लाडकी बहीण योजनेत किती खर्च झाला आणि येणाऱ्या वर्षात किती खर्च प्रस्तावित आहे, याबाबतही सांगितलं. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहाबाहेर आले. याचदरम्यान ठाकरे गटाचे नेत उद्धव ठाकरे हे देखील विधानसभा परिसरात दाखल झाले. यावेळी विधिमंडळाच्या गॅलरीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.

उद्धव ठाकरेंसोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. उद्धव ठाकरे समोर येताच देवेंद्र फडणवीस यांनी यांना नमस्कार केला. यावेळी त्यांच्यात संभाषणही झाल्याचं पाहायला मिळालं.गॅलरीतून जात असताना उद्धव ठाकरेंना पाहून फडणवीसांनी हसत हसत हात जोडले. यावेळी उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले की काय तुम्ही मर्सिडिजचे भाव वाढवले नाहीत? उद्धव ठाकरेंचा हा मिश्किल सवाल ऐकताच फडणवीसांना हसू आवरले नाही, त्यानंतर ते तिथून निघून गेले.फडणवीसांच्या मागेच एकनाथ शिंदे होते. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे तिथे असल्याचं कळताच शिंदेंनी त्यांच्याकडे न बघता बाहेर पडणे सोयीचं समजलं. तर, उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदेंकडे बघितलं नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकमेकां नजरही न मिळवता तेथून जाणे पसंत केले.तसेच, उद्धव ठाकरेंनी यावेळी अजित पवारांनाही टोला लगावल्याचं पाहायला मिळालं. विधान भवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचीही भेट झाली. यावेळी ठाकरे अजित दादांना उद्देशून म्हणाले की हा तुमचा अर्थसंकल्प नाही. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या मात्र, त्या पूर्ण करण्यात महायुतीला काही यश आलेलं नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात हव्या तशा मोठा घोषणा पाहायला मिळाल्या नाहीत. यावरुन उद्धव ठाकरेंनी अजितदादांना टोला लगावला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.