मोदी शाह ऐतिहासिक पाऊल उचलणार, भाजपला मिळणार पहिली महिला अध्यक्ष? दोन नावं चर्चेत.

 भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची चर्चा सर्वत्र असताना मोदी शाह मोठा डाव खेळू शकतात. देशात पक्ष मजबूत असतानाच महिलेकडे भाजपचे नेतृत्व देऊ शकतात.भारतीय जनता पक्षाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. येत्या काळात देशात बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडू अशा महत्त्वाच्या राज्यांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे अध्यक्षांची निवड लवकरच होऊ शकते असा कयास बांधला जात आहे. मुख्यंमंत्री असो वा अध्यक्ष मोदी शाह यांच्या मनात नेमके काय आहे याचा थांगपत्ता लागणे महाकठीण आहे. मात्र यावेळी अशी चर्चा आहे की पक्षाकडून मोठा डाव खेळला जाणार आहे. भाजपच्या इतिहासात जे कधीच झाले नाही असा निर्णय मोदी शहा घेऊ शकतात. तो म्हणजे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिला नेत्याची निवड.भारतीय जनता पक्षाने दिल्लीत महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांना विराजमान केले. त्यानंतर अध्यक्षपदीही महिलेची निवड करुन देशात एक संदेश देण्याचा प्रयत्न पक्षाचा असू शकतो.

भाजपमध्ये आज अनेक महिला नेत्या असल्या तरी सुष्मा स्वराज यांच्यानंतर लोकांमधील कणखर महिला नेतृत्त्वाची कमी भाजपला नेहमीच जाणवली आहे. आता मात्र भाजप वेगळा विचार करत पक्षाचे नेतृत्व महिलेला देऊन राजकारणाला नवी दिशा देऊ शकतो.राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणाऱ्या महिला नावांपैकी सर्वात जास्त चर्चा ही वनाथी श्रीनिवासन यांची आहे. वनाथी श्रीनिवासन या महिला मोर्चाच्या प्रमुख आहेत. त्या तामिळनाडूमधून येतात. श्रीनिवासन या तामिळनाडू कोईम्बतूर दक्षिण या मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अभिनेते कमल हसन यांचा पराभव केला होता. पुढच्या वर्षी तामिळनाडूची निवडणुक आहे.त्यामुळे श्रीनिवासन यांचे नाव आघाडीवर आहे.अजून एका महिला नेत्याच्या नावाची चर्चा आहे. त्या आहेत डी पुरंदरेश्वरी. ज्या आंध्र प्रदेशातून भाजपच्या खासदार आहेत. तसेच राज्य अध्यक्ष आहेत. त्यांना दक्षिणेची सुषमा स्वराज ही बोलले जाते. त्या आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांच्या कन्या आहेत. मोदी शाह यांना आता दक्षिण दिग्विजयाचे वेध लागले आहेत त्यामुळे महिला नेत्यांची चर्चा असणारी दोन्ही नावे ही दक्षिणेतील आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.