स्लिम होण्याच्या हट्टापायी जीव गमावला, ऑनलाइन डाएट फॉलो करण्याऱ्या १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू.

स्लिम होण्याच्या हट्टापायी एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही तरुणी ऑनलाइन डाएट फॉलो करत होती. लठ्ठपणावर मात करण्यासाठी केलेला डाएट जीवावर बेतला आहे.फिट राहण्यासाठी अनेक जण डाएटचा अवलंब करतात मात्र हे डाएट योग्य सल्ल्यानुसार नसेल तर तुमचा घात होऊ शकतो. असे एक प्रकरण केरळमधून समोर येत आहे. १८ वर्षीय तरुणीचं डायटिंगमुळे मृत्यू झाला आहे. या तरुणीनं वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने खास डाएट प्लॅन फॉलो केला होता.या अगोदर तिने लठ्ठ होण्याच्या भितीने खाणे सोडले होते.
कन्नुरमधील कुथुपरम्बामध्ये राहणारी श्रीनंदाचा एका रुग्णालयातमृत्यू झाला. अखेरच्या काळात ती व्हेंटिलेटर सपोर्टवर होती. तिच्या कुटुंबियांचे म्हणणे होते की,श्रीनंदा ही वाढत्या वजनामुळे चिंतेत होती. त्यामुळेच तिने जेवण सोडले होते तसेच व्यायाम करत होती. ती परलिक्विड डाएटवर होती या डाएट प्लॅनमध्ये व्यक्ती ही केवळ द्रव्य पदार्थांचे सेवन करते. याचा अतिरेक झाल्याने तिची प्रकृती खालावली

ही पजहस्सिराजा येथील एनएसएस कॉलेज मध्ये पदवीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होती. तज्ञांनुसार श्रीनंदाचे प्रकरण हे एनोरेक्सिया नर्वोसा (Anorexia Nervosa)असू शकते. हा एक खाण्यासंबंधी आजार आहे. यात सुरूवातीच्या लक्षणामध्ये व्यक्ती अनेक प्रकारचे पदार्थ सेवन करणे सोडतो. कोरोनानंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.आजच्या काळात सर्वच वयोगटातील लोकांमध्ये लठ्ठपणा ही एक समस्या बनली आहे. अनेक जण वजन वाढले तरी तणावग्रस्त होतात आणि स्लिम होण्यासाठी नवनवीन उपाय करत असतात. वजन नियंत्रित ठेवणे हे शरीरासाठी चांगली बाब आहे. मात्र याकरिता तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. ऐकीव माहितीवर अथवा ऑनलाईन माहिती मिळवून डाएट करणे जोखि‍मेचे आहे. चूकीचा डाएट प्लॅन तुमचा घात करु शकतो.वजन कमी करण्याच्या नादापायी इंटरनेटवरील डाएट चार्ट वर्कआऊट प्लॅन अनेक जण फॉलो करु लागतात. डिटॉक्स डाएट , कीटो डाएट असे डाएटचे प्रकार सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीसाठी असे डाएट लागू होतीलच असे नाही. तज्ञच तुम्हाला तुमच्या शरीरानुसार योग्य प्रकारचे डाएट प्लॅन देऊ शकतात. त्यामुळे डाएटिशनचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.