परदेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या अक्कलकुवा येथील मदरश्या वर बंदी आणावी,सकल हिंदू समाजा च्या वतीने महामोर्चाचे आयोजन. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे मदरच्या मध्ये काही दिवसापूर्वी यमनयेथील विदेशी नागरिक सापडले होते त्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली परंतु या मदरशामध्ये विदेशी नागरिक आले कसे हे किती दिवसापासून थांबले होते, शिक्षणाच्या नावाखाली येथे आतंकवादी घडवत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे . यासाठी अक्कलकुवा येथील मदरश्याची सखोल चौकशी करून मदरशावर बंदी करून या मदरश्याला मदत करणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मागणीसाठी आज नंदुरबार येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात क्षेत्र गोदावरी धामचे पिठाधिश महंत रामगिरी महाराज ,राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित ,माजी खासदार डॉ हिना गावित, भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यासह शेकडो हिंदू बंधू भगिनी सहभागी झाले होते. सदर मोर्चात परदेशी नागरीकांना आश्रय देणाऱ्या मदरश्यावर बंदी आणावी, राज्यातील सर्व मदरश्याची सखोल चौकशी करावी, परदेशी घुसखोरावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली .
यावेळी क्षेत्र गोदावरीधाम चे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले की नंदुरबार जिल्हातील अक्कलकुवा मधील मदरश्यामध्ये विदेशी घुसखोर आले कसे याची माहिती प्रशासनाला नाही का ? सदर मदरश्याची सखोल चौकशी करून मदरशावर बंदी आणावी त्यासोबत राज्यातील सर्व मदरश्याची चौकशी करण्यात यावी तसेच मदरशांना मदत करणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे. त्यासोबत मदरश्याचे अनुदान बंद करण्यात यावे. मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या वर्फबोर्ड च्या जमिनीची चौकशी करून अवैध जमिनी सरकारने ताब्यात घ्याव्यात, ज्याप्रमाणे हिंदू मंदिरांचे उत्पन्न वाढल्यास ते मंदिर सरकार आपल्या ताब्यात घेते त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मदरशे व चर्चची देखील उत्पन्नाची चौकशी करून अधिक उत्पन्न कमवनाऱ्या मदरसा व चर्च सरकारने ताब्यात घ्यावेत ज्याप्रमाणे हिंदू धर्मांना नियम लावण्यात आले आहे तसेच नियम इतर धर्मियांना सुद्धा लावण्यात यावे.नंदुरबार जिल्ह्यात मोठा प्रमाणात धर्मांतरण सुरू आहे याची देखील सकल चौकशी करण्यात यावी अशी मागणी महंत रामगिरी महाराज यांनी आज केली आहे.महंत रामगिरी महाराज पिठाधिश गोदावरी धाम









