खोक्याभाई राहिला बाजूला, ढाकणे पिता-पुत्रांवरच कारवाईचा बडगा, गंभीर गु्ु्ुन्हे दाखल.

१९ फेब्रुवारीला दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. परंतु त्याचवेळी, पोलिसांमध्ये गेल्यावर उलट आपल्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीती ढाकणे पिता-पुत्रांना होती. त्यामुळे आता त्यांच्यावरच इतर दोघांसहीत शिरूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदा तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईने ज्यांना मारहाण केली होती त्या ढाकणे पिता-पुत्रांवरच ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १९ फेब्रुवारीला दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. परंतु त्याचवेळी, पोलिसांमध्ये गेल्यावर उलट आपल्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीती ढाकणे पिता-पुत्रांना होती. बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात आदिवासी पारधी समाजातील मुलीला मारहाण प्रकरणी ॲट्रॉसिटी, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावी गावातील मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांनी आदिवासी पारधी समाजातील मुलींना मारहाण व छेडछाड केली. यां प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच पोक्सोअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हानपुडे पाटील हे करत आहेत.भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईने आपल्या शिकारीच्या नादापायी अनेक वन्य प्राण्यांची शिकार केली. असेच एकदा खोक्या त्याच्या सहकार्यांसोबत दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरिण पकडण्यासाठी गेले असता, ढाकणे यांनी त्याची अडवणूक केली. तेव्हा संतापलेल्या खोक्या आणि त्याच्या सहकार्यांनी ढाकणे पिता-पुत्रांवर हल्ला केला. ज्यात दिलीप ढाकणे यांचे 8 दात पडले आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला. ढाकणे यांच्या मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला लंगडत चालावे लागत आहे. त्याच्या अंगावर जखमा देखील आहेत.दरम्यान, पोलिसांकडे गेल्यावर त्यांच्या चौकशीत आपलीही अंडी पिल्लं बाहेर येतील. त्यामुळे घटनेची माहिती पोलिसांना द्यावी की नाही अशा दुविधेत ढाकणे होते. त्यातच, खोक्या भाईने शिरुर गावातील दिलीप ढाकणे यांच्यासह त्याचा मुलगा महेश ढाकणेला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेच्या अटकेची मागणीने जोर धरला.

त्यातच ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तथापी, ढाकणे आणि त्यांचा मुलगा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.दरम्यान, आपण भाजपचा पदाधिकारी आहोत असे बोलल्याचा सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर भाजपाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. सतीश भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता असून, तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो. तरीदेखील त्याने चुकीची माहिती सांगून पद मिळवले होते. हे कळल्यानंतर २०२१ साली त्याची पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर तो पक्षविरोधी कारवाई, खंडणी, अपहरण असे प्रकार करत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्याच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देखील घेतला होता. सध्या तो कुठल्याही पदावर नाही, असे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.