यावल तालुक्यात यशोगाथा अकॅडमीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इतिहास स्पर्धेचे आयोजन.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गुणकथा, पराक्रम आणि इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी यशोगाथा अकॅडमीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील महाराजांच्या जयंतीनिमित्त भरवलेल्या या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि “जय भवानी! जय शिवाजी!” या गर्जनांनी करण्यात आली.

यावेळी उपस्थितांचे उत्साहपूर्ण प्रतिसादाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले. स्पर्धेमध्ये दोन गटांमध्ये एकूण 680 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.प्रथम गट (इयत्ता चौथी ते सहावी) : 345 विद्यार्थी मोठा गट (इयत्ता सातवी ते नववी) : 335 विद्यार्थी स्पर्धा 50 गुणांच्या बहुत पर्याय स्वरूपातील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून झाली. या परीक्षेतील सर्व प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर, कार्यावर आणि इतिहासावर आधारित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोगाथा अकॅडमीचे संस्थापक उमेश धनगर सर होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजिनी मॅडम येवले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू सुरणार सर, अभिजीत तायडे सर, सगुना महाजन मॅडम, खुशबू पाटील मॅडम, भूषण धनगर, कमलेश शिर्के, पवन कोळी, धीरज तायडे, श्याम निळे यांनी विशेष परिश्रम घेतले.गेल्या तीन वर्षांपासून यशोगाथा अकॅडमी ही स्पर्धा सातत्याने आयोजित करत आहे. या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजावा, त्यांच्या पराक्रमातून प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या विचारांचे रोपण तरुण पिढीत व्हावे, हा उद्देश आहे.यशोगाथा अकॅडमीने पुढील वर्षांमध्ये ही स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.