लघुशंका करताना तोल गेला, दारूच्या नशेत तर्र असलेला पुण्याचा पर्यटक दरीत कोसळला.

पुण्याहून पर्यटनासाठी आलेला एक मद्यपी पर्यटक लघुशंका करत असताना तोल जाऊन दरीत कोसळला. या घटनेने त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या मित्रांमध्ये एकच गोंधळ माजला.रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग राज्य महामार्गावरील कार्ले खिंडीत असणाऱ्या पात्रूदेवी नजिक असलेल्या आज सायंकाळी पुणे येथील मद्यपी पर्यटक हरिश्चंद्र गोसावी हा कठड्यानजिक उभा राहून लघुशंका करीत असताना तोल गेल्याने तो दरीत कोसळून जखमी झाला असल्याने त्यास कार्लेखिंडी नजिक असणाऱ्या गोठेघर येथील प्रयास रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे येथून हरिश्चंद्र गोसावी आणि त्याचे मित्रमंडळी हे फोरव्हीलर अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते. अलिबाग येथील पर्यटन स्थळी भेट दिल्यानंतर पर्यटकांनी मद्यपान पार्टी केली. संध्याकाळच्या सुमारास हरिश्चंद्र गोसावी हे आणि त्याचे मित्र पुणे येथे जाण्यासाठी निघाले होते.

अलिबाग पासून काही अंतरावर असणाऱ्या कार्ले खिंडीत असणाऱ्या पात्रूदेवी नजिक गाडी उभी करून हरिश्चंद्र गोसावी हे लघुशंका करण्यासाठी कठड्यानजिक गेले असता लघुशंका करीत असताना तोल गेल्याने हरिश्चंद्र गोसावी हे दरीत कोसळले.हरिश्चंद्र गोसावी हे दरीत कोसळले असल्याने त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी वाचविण्यासाठी तेथून जाणाऱ्या नागरिकांकडे मदत मागितली. तेथे जमलेल्या सुजान नागरिकाने तात्काळ वाहतूक कर्मचारी यांना संपर्क साधला असता वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार अमित साळुंखे आणि रुपये शिर्के यांनी तातडीने घटना स्थळी दाखल होत.

त्यांनी तेथे असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांची मदत घेत अर्धा पाऊण तासाच्या अथक प्रयत्नाने हरिश्चंद्र गोसावी यांना जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढले आणि ताबडतोब त्यांना कार्लेखिंडी नजिक असणाऱ्या गोठेघर येथील प्रयास रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले.प्रयास हॉस्पिटल मध्ये डॉ. रवी म्हात्रे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठवले. डॉ म्हात्रे यांनी सांगितले की, हरिश्चंद्र गोसावी यांच्या मानेला जखम झाली होती तसेच हातापायामध्ये ताकत राहिली नव्हती म्हणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकाद्वारे पुणे येथे जखमी याचे मित्र मंडळी घेऊन गेले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.