आयुध निर्माणी स्फोट प्रकरणात ४ अधिकाऱ्यांवर गुन्हे; निष्काळजीपणाचा ठपका, नऊ कर्मचाऱ्यांनी गमावलेला जीव.

आरएक्स विभागातील एलटीपीई सेक्शनच्या इमारत क्रमांक २३मध्ये असलेल्या एक्सस्ट्रूमिक्स मशीन व त्यातील उपकरणामध्ये बिघाड होत होता. या मशीनच्या दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले.जवाहरनगर आयुध निर्माणीत २४ जानेवारीला झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. चार अधिकाऱ्यांसह इतरांनी निष्काळजीपणा केल्यानेच हा स्फोट झाल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरएक्स विभागातील एलटीपीई सेक्शनच्या इमारत क्रमांक २३मध्ये असलेल्या एक्सस्ट्रूमिक्स मशीन व त्यातील उपकरणामध्ये बिघाड होत होता. या मशीनच्या दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. नियमित साफसफाई व देखभालीकडेही दुर्लक्ष केले गेले. प्रशिक्षणार्थींना अतिसंवेदनशील ठिकाण असलेल्या या विभागामध्ये कामाकरिता पाठविल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे या विभागात कर्तव्यावर असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस आयुध निर्माणी जवाहरनगरचे ‘सेफ्टी सेक्शन’चे विभागीय अधिकारी देवेंद्र रामदास मिना (४९), मेंटेनन्स विभागाचे ज्युनिअर वर्क मॅनेजर आदिल रशील फारुकी (४६ ), सामान्य प्रशासन विभागाचे संजय सुरेश धपाडे (४४) , सेक्शन प्रभारी अधिकारी आनंदराव मधुकरराव फाये (५०) व आयुध निर्माणी जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर अधिकारी हे कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे.या चार अधिकाऱ्यांसह इतरांवर जवाहरनगरचे पोलिस निरीक्षक भिमाजी पाटील (४२) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कुलकर्णी करीत आहेत.आयुध निर्माणीतील स्फोटात कर्तव्यावर असलेल्या तेरापैकी मनोज मेश्राम (५५, रा. बेला), अजयकुमार नागदेवे (५१, रा. परसोडी), चंद्रशेखर गोस्वामी (४९ रा. जवाहरनगर), अभिषेक गोपाल चौरसिया (३८, रा. भंडारा), लक्ष्मण केळवदे (४५, रा. जवाहरनगर), धम्मानंद रंगारी (४०, रा. भंडारा), अंकित बारई (२०, रा. साहुली), संजय कारेमोरे (३७, रा. खात, जि. नागपूर), जयदीप बॅनर्जी यांचा मृत्यू झाला होता. यांच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.