आधी ओढत नेले नंतर कालव्यात बुडवले अन् वार केला; हम्पीमधील ‘त्या’ म्युजिक नाईटची थरकाप उडवणारी कहाणी.

कर्नाटकच्या हम्पीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एक २७ वर्षीय महिला इस्रायली पर्यटक आणि महिला होमस्टेवरील होस्टवर बलात्कार करण्यात आला. त्याचबरोबर ओडिया पर्यटकाची देखील हत्या केल्यानंतर सारेच हादरले आहेत. या घटनेचा थरार समोर आला आहे.कर्नाटकच्या हम्पीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एक २७ वर्षीय महिला इस्रायली पर्यटक आणि महिला होमस्टेवरील होस्टवर बलात्कार करण्यात आला. त्याचबरोबर ओडिया पर्यटकाची हत्या केल्यानंतर सारेच हादरले आहेत. ही घटना गंगावती तालुक्यातील सानापूर तलावाजवळ घडली आहे. जे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या हम्पीपासून केवळ २५ किमीच्या अंतरावर आहे. याप्रकरणातील दोन्ही नराधम आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोप्पलचे एसपी राम एल अरासिद्दी यावर माहिती देताना म्हणाले की, आणखी एक संशयित अजूनही फरार आहे, परंतु त्याच्या ठावठिकाण्याबद्दल आमच्याकडे ठोस पुरावे उपलब्ध आहेत.वृत्तानुसार, ही घटना ६ मार्चला रात्री उशिरा घडली होती. दोन महिला आणि तीन पुरुष आणि सर्व पर्यटक, तुंगभद्रा डाव्या तीर कालव्याजवळ तारे पाहण्यासाठी गेले होते आणि ते कालव्याच्या काठावर गिटार वाजवत होते आणि संगीताचा आस्वाद घेत होते.

यावेळी पाच जण होमस्टेमध्ये भेटले. आणि अचानक रात्री ११ वाजता तीन संशयित लोक सानापूर शहरातील एका बारमध्ये दारू पीत बसले होते. यानंतर ते दुचाकीवरून कालव्याजवळ पोहोचले आणि सुरुवातीला पेट्रोलसाठी पैसे मागितले. पर्यटकांनी त्यांना २० रुपये दिले, पण लोकांनी १०० रुपये मागितले. पर्यटकांनी नकार दिल्यावर संशयितांनी शिवीगाळ केली आणि बघता बघता वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले.जेव्हा तीन पुरुष पर्यटक, अमेरिकेतील डॅनियल पिटास (२३), नाशिकमधील पंकज अमृत राव पाटील (४३) आणि ओडिशातील बिबाश (२६) यांनी वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोरांनी तिन्ही पर्यटकांना कालव्यात ढकलले.

पिटास आणि पाटील पोहत सुरक्षित बाहेर निघाले असताना, शनिवारी पहाटे घटनास्थळापासून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या कालव्यात बिबाशचा मृतदेह आढळला. त्यानंतर दोन हल्लेखोरांनी होमस्टेच्या मालकीणीचा गळा पकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या संशयिताने एका इस्रायली महिलेवर देखील बलात्कार केला. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी दोन सेलफोन आणि ९ हजार ५०० रुपये रोख रक्कमही लंपास केली.या घटनेच्या तीन तासांनंतर पीडित महिलांनी शुक्रवारी पहाटे ५ वाजता गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी गंगावती ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. त्यांना त्वरित उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथके तपासासाठी तैनात केली. पीडितांनी अटक केलेल्या संशयितांची ओळख पटवली आहे. पोलिस पथके, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि तांत्रिक देखरेखीच्या जोरावर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तर एक संशयित अद्याप फरार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.