परीक्षा २५ एप्रिलपर्यंतच, विविध संघटनांच्या विनंती पत्रानंतरही शिक्षण विभाग निर्णयावर ठाम; उन्हाचा मुद्दा गैरलागू.

या निर्णयाला विविध शिक्षक, मुख्याध्यापक संघटना आणि शाळा प्रशासनांनीही विरोध केला. हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षापासून राबवला जावा, अशी मागणी करत या संघटनांनी ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार आणि शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्याकडे निवेदने दिली. या निवेदनांमध्ये २५ एप्रिलनंतर पेपर तपासून निकाल तयार करण्यासाठी अपुरा असलेला कालावधी, उन्हाळा, तसेच १४ ते ३० एप्रिलदरम्यान केले जाणारे छंदवर्ग व विशेष वर्ग यांचे आयोजन असे विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले.राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) आखलेल्या वेळापत्रकानुसार घेऊ नयेत, अशी विनंती विविध शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी केल्यानंतरही शिक्षण विभाग आपल्या निर्णयावर ठाम आहे. या संघटनांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी एकही मुद्दा निर्णय फिरवण्याएवढा ताकदीचा नसल्याने परीक्षा २५ एप्रिलपर्यंतच होणार असल्याचे संकेत ‘एससीईआरटी’चे संचालक आणि शिक्षण विभागाचे आयुक्तांनी दिले आहेत.’असर’सारख्या संस्थांच्या पाहणी अहवालात राज्यातील शिक्षणाचा दर्जा खालावल्याचे समोर येते. त्यातच जवळपास सर्वच शाळा १५ एप्रिलच्या आधीच पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा पार पाडतात. त्यामुळे शैक्षणिक वर्ष ३० एप्रिलपर्यंत असतानाही १४ एप्रिलनंतरचे १५ शैक्षणिक दिवस वाया जातात.

त्यामुळे यंदा ‘एससीईआरटी’ने राज्यातील सर्वच शाळांमध्ये संकलित व नियतकालिक मूल्यमापन चाचणी व वार्षिक परीक्षा ८ ते २५ एप्रिल या कालावधीत घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले.या निर्णयाला विविध शिक्षक, मुख्याध्यापक संघटना आणि शाळा प्रशासनांनीही विरोध केला. हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षापासून राबवला जावा, अशी मागणी करत या संघटनांनी ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार आणि शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्याकडे निवेदने दिली. या निवेदनांमध्ये २५ एप्रिलनंतर पेपर तपासून निकाल तयार करण्यासाठी अपुरा असलेला कालावधी, उन्हाळा, तसेच १४ ते ३० एप्रिलदरम्यान केले जाणारे छंदवर्ग व विशेष वर्ग यांचे आयोजन असे विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले.’पेपर तपासणीबाबत याआधीच सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील उन्हाळा आणि शाळांकडून १५ ते ३० एप्रिल या काळात आयोजित केले जाणारे छंदवर्ग हे दोन्ही मुद्दे परस्परविरोधी आहेत. शाळा एप्रिलच्या मध्यानंतर या छंद वर्गांसाठी सुरू असतील आणि तेव्हा उन्हाचा त्रास होत नसेल, तर तो परीक्षेसाठीच कसा व्हावा’, असा प्रश्न रेखावार यांनी उपस्थित केला.

सध्या आम्ही सर्व निवेदनांमधील मुद्द्यांवर विचार करत आहोत. मात्र यापैकी एकही मुद्दा परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठी ठोस नाही. इतर क्षेत्रांमधून किंवा इतर संबंधितांकडून आणखी कोणते मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात, याचाही परामर्श आम्ही घेत आहोत.
– राहुल रेखावार, संचालक, एससीईआरटी

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.