पारोळा शहरात गेल्या महिन्याभरापासुन भुईकोट किल्ला व खंदका बाहेरील अतिक्रमण उठवणेबाबतचा विषय चर्चेत आहेत. या ठिकाणचा व्यावसायिक व घरे असणाऱ्या अतिक्रमण धारकांना नोटीसीव्दारे आपले अतिक्रमण हटविण्यासाठी कळविण्यात आले होते. ही नोटीस प्राप्त होताचं या अतिक्रमण धारकांनी माझी भेट घेतली होती, या भेटी वेळी या अतिक्रमण धारकांना आश्वासक आधार देत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ठोस आश्वासित केले होते.
तद्नंतर सद्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांची भेट घेवुन परिस्थिती लक्षात आणुन देत पत्रव्यवहार देखील केला, त्यावर मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी दखल घेत अतिक्रमण धारकांवर अन्याय होवु देणार नसल्याचे मला ठोस आश्वासित केले.आज त्याच अनुषंगाने अतिक्रमण धारक व्यापारी व नागरीकांना माझी भेट घेतली व केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले.
यावेळी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपले दैनंदिन जीवन जगा, अडचण आल्यास मी आपल्या सोबत असल्याचे पुन्हा या मंडळींना आश्वासित केले.









