जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन.

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन. जळगाव जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आणि जळगाव जिल्हा महिला शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, गोळाफेक, बॉल थ्रो, सूर्यनमस्कार, चमचा-लिंबू शर्यत, संगीत खुर्ची आणि योगासने यांचा समावेश होता. चार वयोगटांत या स्पर्धा घेण्यात आल्या. सन्माननीय उपस्थिती आणि पारितोषिक वितरणस्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास सद्गुरू भक्तराज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. भारती चौधरी, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सोनल इंगळे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी नेहा देशमुख, महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश जाधव, विभागीय महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, आंतरराष्ट्रीय योगा पंच डॉ. अनिता पाटील, राज्य योगा क्रीडामार्गदर्शक श्रीमती चंचल माळी, क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. प्रत्येक क्रीडा प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.विशेष सन्मान आणि आयोजन समितीविशेष सन्मान म्हणून नाशिक ते लेह-लडाख सायकल मोहीम पूर्ण करणाऱ्या कामिनी धांडे, वेटरन राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू  छाया तायडे आणि सोनल विचवेकर यांचा सत्कार करण्यात आला.

या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जळगाव जिल्हा महिला शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या पदाधिकारी व शिक्षकांनी विशेष योगदान दिले. मुख्याध्यापिका  कांचन नारखेडे, चारुशीला पाटील, जयश्री माळी, सरस्वती ढाके,  समिधा सोवनी, शालिनी तायडे, विजया चौधरी, डॉ. कांचन विसपुते, कु. श्वेता कोळी,धनश्री सोनी यांनी पंच व आयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कांचन विसपुते यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत केले, तर आभारप्रदर्शन समिधा सोवनी यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे यांचे विशेष सहकार्य लाभले. उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.