मजुरीचे पैसे मागताच ठेकेदाराची मारहाण, जखमी मजुराचा मृत्यू, खळबळजनक प्रकार.

उदगीरमधील मजूर तानाजी बाबुराव सोनकांबळे यांना ठेकेदारांकडून मजुरीच्याऐवजी जेवण आणि दारू दिली जात होती. विरोध करून मजुरी मागितल्यावर ठेकेदार आणि त्याच्या साथीदारांनी सोनकांबळे यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.मजुरीच्या बदल्यात जेवण आणि दारू देण्याऐवजी मला मजुरीचे पैसे द्या, अशी मागणी केल्याने ठेकेदारासह तिघांनी तानाजी बाबुराव सोनकांबळे या मजुरास बेदम मारहाण केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी शहरातील गरुड चौकात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी सोनकांबळे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे ठेकेदारासह तिघांविरोधात शहरातील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात खून आणि ॲट्रॉसिटीच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा घेऊन मजुराच्या नातेवाइकांनी आंदोलन सुरू केले होते.

त्यानंतर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी स्वत: लक्ष घालून विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात थांबून पीडितांची तक्रार नोंदवून घेतली. उदगीर शहरातील शिवशक्तीनगर भागात राहणारे तानाजी बाबुराव सोनकांबळे (वय ४०) मजूर असून, उदगीर येथील ठेकेदार मेहराज पटेल यांच्याकडे काम करीत होते. ठेकेदार मजुरांना काम केल्यानंतर मजुरी न देता जेवण आणि दारू देत.सोनकांबळे यांनी याला विरोध करून, मजुरीचे पैसे मागितले होते. त्या वेळी मेहराज पटेल व त्याचे अन्य दोन साथीदार खलील व गौस (पूर्ण नावे नाहीत) या तिघांनी मिळून तानाजी सोनकांबळे यांना लातूर शहरातील गरुड चौक परिसरात पाच मार्चला बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेले सोनकांबळे यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनेक गंभीर जखमा सोनकांबळे यांना मारहाणीत झाल्या होत्या.शिवशक्तीनगर भागात राहणारे तानाजी बाबुराव सोनकांबळे (वय ४०) मजूर असून, उदगीर येथील ठेकेदार मेहराज पटेल यांच्याकडे काम करीत होते. ठेकेदार मजुरांना काम केल्यानंतर मजुरी न देता जेवण आणि दारू देत.

सोनकांबळे यांनी याला विरोध करून, मजुरीचे पैसे मागितले होते. त्या वेळी मेहराज पटेल व त्याचे अन्य दोन साथीदार खलील व गौस (पूर्ण नावे नाहीत) या तिघांनी मिळून तानाजी सोनकांबळे यांना लातूर शहरातील गरुड चौक परिसरात पाच मार्चला बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेले सोनकांबळे यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनेक गंभीर जखमा सोनकांबळे यांना मारहाणीत झाल्या होत्या.उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी लातूरहून उदगीरला गेले होते. मृत सोनकांबळे यांच्या नातेवाइकांनी आंदोलन सुरू करताच उदगीर पोलिसांनी मेहराज पटेल, खलील आणि गौस या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे यावेळी स्वत: पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करताना उपस्थित होते. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. नातेवाईकांनी काही गंभीर आरोपही केले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.