पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर, सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यातून पहाटे…

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात बलात्काराच्या घटनेनंतर सुरक्षारक्षकांचा अहोरात्र पहारा असतानाही एक धक्कादायक घटना घडलीय. सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यातून चोरांनी हात साफ केल्याची घटना समोर आली आहे.पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकांसह जिल्ह्यातील बहुतांश एसटी स्थानकांत सुरक्षा व्यवस्था खिळखिळी असल्याचे चित्र आहे. बलात्काराच्या घटनेनंतर स्वारगेट एसटी स्थानकात सुरक्षारक्षकांचा अहोरात्र पहारा लावलेला असताना आणि पोलिसांनी गस्त वाढवलेली असतानाही शनिवारी (आठ मार्च) पहाटे साडेपाच वाजता एका बसमधून प्रवाशाचा लॅपटॉप चोरीला गेला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.बलात्काराच्या प्रकरसीनंतर स्वारगेट एसटी स्थानकात सुरक्षारक्षकांचा खडा पहारा नेमण्यात आला असून, पोलिसांनी गस्तही वाढली आहे. यामुळे उपद्रवी प्रवृत्तीच्या लोकांसह चोरट्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बसमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेने सर्व अपेक्षा फोल ठरल्या.वाकड येथे राहणाऱ्या केतन मोरे या तरुणाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोरे हे सेनापटी बापट रस्त्यावरील एका कंपनीत नोकरी करतात. कंपनीने त्यांना कामासाठी लॅपटॉप दिला होता. शनिवारी पहाटे रायगड जिल्ह्यातील महाड या मूळ गावी जाण्यासाठी ते पत्नी आणि मुलासह वाकड येथून पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट एसटी स्थानकावर आले. महाडच्या बसचे तिकीट काढून ते कुटुंबीयांसह बसमध्ये बसले होते. त्यांनी जवळचे सामान आणि लॅपटॉप बॅग एसटीमध्ये वरील बाजूच्या कॅरिअरवर ठेवली.

काही मिनिटांत बस सुटण्यासाठी सज्ज झाल्यावर मोरे यांनी सामानाची पडताळणी केली; त्या वेळी लॅपटॉप बेंग गायब असल्याचे समजले. बसमध्ये सर्वत्र शोध घेऊनही बॅग न सापडल्याने त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. उपनिरीक्षक बाळू शिरसाट या प्रकरणी तपास करीत आहेत.स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा ‘सीआर मोबाइल पॉइंट’ आहे. या ठिकाणी दररोज पोलिसांची गाडी, कर्मचारी थांबलेले असतात. रात्रपाळीतील पथकाकडूनही गस्त घातली जाते. अशा कडेकोट पहाऱ्यातही चोरटे ‘सक्रिय’ असल्याचे दिसत आहेत. दत्तात्रय गाडे याने स्वारगेटमध्ये महिलेवर केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर तेथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.