घरात वाद झाला, संतापाच्या भरात तरुणाने १३ वाहनं पेटवली; मध्यरात्री पुण्यात थरार.

पुण्यातील एका तरुणाने मध्यरात्री १३ वाहनांना आग लावल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसंच तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यात एका २७ वर्षीय तरुणाने एकाच वेळी इमारतीतील पार्किंगमध्ये १३ वाहनांना मोठी आग लावल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडवण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुण्यातील इंगळेनगर परिसरात २७ वर्षीय तरुणाने इमारती खालील १३ वाहनांना आग लावली. तरुणासोबत कुटुंबाचा वाद झाला होता. त्यानंतर त्या रागात त्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचं सतत त्याच्या आई-वडिलांसोबत भांडण होत होतं. तो दारुच्या नशेत असायचा. सोसायटीतील रहिवाशांनी तसंच त्याच्या पालकांनी त्याला नशा मुक्ती केंद्रात दाखल केलं होतं. पण घटनेच्या रात्री त्याचा पालकांशी वाद झाला आणि त्याने रागात सर्व वाहनांना आग लावली.

नशेच्या आहारी गेलेला आरोपी त्याच्या आई, वडील आणि भावाला त्रास देतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दिली त्याने आणि इमारतीतील इतर रहिवाशांनी त्या कुटुंबाची मदत केली आणि आरोपीला नशा मुक्ती केंद्रात पाठवलं होतं. पण घटनेच्या रात्री आरोपीचा घरी वाद झाला आणि त्याने मध्य रात्री साडे तीन वाजता आपल्या आई आणि भावाच्या दुचाकीला आग लागली.

त्या दोन वाहनांना लागलेली आग पसरली आणि इतर ११ वाहनं देखील आगीच्या विळख्यात आली. या घटनेनंतर सोसायटीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवलं नसतं, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, असं नागरिकांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३२६ (दुखापत, पूर, आग किंवा स्फोटक पदार्थाद्वारे कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरुणाला या प्रकरणात अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.